आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’तर्फे नाेव्हेंबरमध्ये नाशकात लिटरेचर फेस्टिव्हल; सई परांजपेंसह राज ठाकरेंचा सहभाग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठी साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील एक नवा प्रयोग म्हणून दिव्य मराठीतर्फे येत्या ११, १२ व १३ नाेव्हेंबर राेजी नासिकमध्ये ‘मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’चे अायाेजन करण्यात अाले अाहे. सई परांजपे, अाशुताेष गाेवारीकर, प्रकाश झा, रंगनाथ पठारे, अजित दळवी, सतीश आळेकर, गिरीश कुलकर्णी, माधव गोडबोले, शेषराव मोरे यांच्यासह मराठीसह अन्य भाषेतील मान्यवर लेखक, प्रकाशक, अभ्यासक यामध्ये सहभागी होणार आहेत.

राज ठाकरे यांचे एका वेगळ्या विषयावरील भाष्य हे या महोत्सवाचे वैशिष्ट असेल. कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा या महोत्सवामध्ये सक्रीय सहभाग असून राजहंस प्रकाशन हे ‘नॉलेज पार्टनर’ म्हणून सहभागी होत आहेत. ‘एक्स्प्रेस इन’, वाणी प्रकाशन यांचाही यामध्ये सहयोग आहे.
जयपूर लिटरेचर फेस्टीव्हलच्या धर्तीवर होणाऱ्या या महोत्सवाचे उद‌्घाटन ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते हाेणार अाहे. या फेस्टिव्हलमध्ये साहित्याशी संबंधीत विविध अंगांवर संवाद साधले जातील. केवळ कथा-कादंबरीपुरता हा संवाद मर्यादित न करता नाटक-चित्रपट, व्यंगचित्र, इतिहास, उद्योग अशा विविध क्षेत्रांचे साहित्याशी कसे नाते आहे, यावर प्रत्येक क्षेत्रातील दिग्गज प्रकाश टाकतील. व्हॅलेंटाईन या चित्रपटाच्या टीमबरोबर अाशुताेष गाेवारीकर एक विशेष सत्र घेतील. ज्येष्ठ दिग्दर्शक प्रकाश झा, अंजुम राजाबली, अभिराम भडकमकर हे चित्रपट-नाटक अाणि साहित्याचे नाते उलगडणार अाहेत. प्रसिद्ध दिग्दर्शक सतिश अाळेकर अाणि नाटककार अजीत दळवी हे साहित्याच्या प्रभावावर वेगळी दृष्टी टाकतील. उद्याेजकांनी लिहिलेल्या अात्मकथनासंदर्भातही एका विशेष परिसंवादाचे अायाेजन करण्यात अाले अाहे. रंगनाथ पठारे व प्रवीण बांदेकर या कादंबरीकारांशी संजय भास्कर जोशी संवाद साधतील. हिंदीमध्ये ‘सुरगाथा’ हे लता मंगेशकर यांचे चरित्र प्रसिद्ध होत आहे. त्याचे प्रकाशन या महोत्सवात होईल. या चरित्राचे लेखक यतिंद्र मिश्रा यांच्याबरोबर संवाद होईल. महाराष्ट्रातील घडामोडींवर ऐतिहासिक दृष्टीकोनातून चर्चा होईल, तर माजी लष्करप्रमुख व्ही के सिंग यांच्या उपस्थितीत भारतासमोरील आव्हानांवर मान्यवर बोलतील. वाचकांना समृद्ध करणारा हा लिटरेचर फेस्टीव्हल असेल. याबद्दल अधिक माहिती लवकर वाचकांना दिली जाईल.

मतदान करा पसंतीच्या साहित्यिकाला
फेस्टिव्हल दरम्यान एका मराठी साहित्यिकाला विशेष पुरस्कार देण्यात येणार अाहे. त्यासाठी विविध वाचनालयांमध्ये मतपत्रिका अाणि मतपेट्याही ठेवल्या अाहेत. त्यावर अापल्या पसंतीच्या हयात असलेल्या साहित्यिकाचे नाव टाकून मतदान करायचे अाहे. अधिक माहितीसाठी हेमंत पवार यांच्याशी 9850089011 या क्रमांकावर संपर्क साधावा.
बातम्या आणखी आहेत...