आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Marathi Man Quarral And Doesn't Come Togeter So He Far Away Of Priminister Post : Manohar Joshi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठी माणूस भांडतो व एकत्र येत नसल्‍याने तो पंतप्रधान पदापासून वंचित: जोशी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मराठी माणूस आपापसात भांडत राहतो. एकत्र राहत नसल्याने मराठी माणसाची पंतप्रधानपदाची संधी हुकली. मराठी माणूस एकत्र नसल्याने सर्वत्र परिणाम भोगावे लागतात. एकत्र आल्यास वेगळे चित्र दिसेल. प्रादेशिक पक्षांचे सरकार असलेला महाराष्ट्र देशात पहिले राज्य ठरेल, असे सूचक उद्गार शिवसेनेचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांनी काढले. नाशिकरोड येथे देवळाली व्यापारी सहकारी बॅँकेच्या प्रधान कार्यालयाच्या नूतनीकरण इमारतीच्या उदघाटनाप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते.

प्रयत्न अपयशी ठरले
शिवसेना-मनसे एकत्र येण्यासाठी करण्यात आलेले प्रयत्न अपयशी ठरले. यावर बोलताना त्यांनी दोन पक्षांत मराठी माणसांची मते विभागली जाऊन नुकसान होत असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली. उद्धव ठाकरे यांनी हात पुढे केला. त्यानंतर जनतेच्या अपेक्षेनुसार भांडणे मिटवून एकत्र येतील, अशी अपेक्षा होती.
सर्वांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रतिक्रियेची उत्सुकता होती. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने एकत्र येण्याची इच्छा नसल्याचे स्पष्ट होते.
शिवसेनाप्रमुखांच्या हयातीत दोघांच्या एकत्रीकरणासाठी केलेला प्रयत्न अखेरचा. त्यानंतर प्रयत्न केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नेतृत्व सिद्ध : मुंबई महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढवून एका अर्थाने शिवसेनेला मदत केली. त्यात उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व सिद्ध केले. यावरून राज काही शिकले असते तर बरे झाले असते, असा खोचक टोला त्यांनी लगावला.शिवसैनिक उत्साहाने कामाला लागले असून राज यांनी स्वबळाची घोषणा केल्याने महाराष्ट्रात वेगळे काही घडेल असे वाटत नसल्याचे ते म्हणाले.

पक्ष सोडलेल्यांना पश्चात्ताप
शिवसेनेतील जुने सहकारी छगन भुजबळ यांच्याशी कार्यक्रमात भेट होते. आजपर्यंत जे शिवसेना सोडून गेले त्यांना पश्चात्ताप होत आहे.कारण शिवसेना हे कुटुंब आहे.कार्यकर्त्यांचे प्रेम फक्त शिवसेनेतच मिळते, इतर पक्षात नाही हे सांगतांना त्यांनी महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनाप्रमुखांनी भुजबळांऐवजी माझी निवड केली.त्या निवडीमागचे गुपित त्यांनी अनेक वर्षांनी काल उघड केले.
पुन्हा प्रवेश नाही
शिवसेनेत नावारूपास येतात आणि स्वार्थासाठी शिवसेना सोडून इतर पक्षात प्रवेश करतात.अशांना पुन्हा पक्षात प्रवेश देण्यात येऊ नये, असा निर्णय घेण्यात आल्याचे सांगून पक्षात मला ज्येष्ठतेनुसार सन्मान दिला जातो. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयात माझा सहभाग असतो. मला डावलले जात असल्याच्या अफवा असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकारिणी निवडीचे अधिकार अध्यक्ष उद्धव ठाकरे यांचे असून लवकरच नाशिकची कार्यकारिणी व संपर्कप्रमुखांची निवड होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.