आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 ऑगस्ट रोजी झळकणार ‘भारतीय’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘भारतीय’ हा मराठी चित्रपट 10 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपट प्रेक्षकांना नक्कीच आवडेल, अशी आशा चित्रपटाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ‘भारतीय’च्या टीमने दिली.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमेवरील एका अनोळखी गावात देशभक्तीने पेटलेला एक शहरी तरुण बदल घडवून आणतो. अशा आशयाचा हा चित्रपट देविशा फिल्मस्च्या अभिजित घोलप यांनी प्रेक्षकांसाठी आणला आहे. याआधी घोलप यांनी ‘देऊळ’ या गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केली होती. या चित्रपटात मकरंद अनासपुरे एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार असून, प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावे यांनी शहरी तरुणाची भूमिका केली आहे. ‘तुकाराम’ चित्रपटातील गंभीर, आध्यात्मिक भूमिका साकारणारा जितेंद्र जोशी या चित्रपटात एका भाबड्या विनोदी तरुणाच्या भूमिकेत दिसणार आहे.
चित्रपटास अजय-अतुल यांनी संगीत दिले असून, र्शेया घोषाल, कुणाल गांजावाला, नंदेश उमप यांनी यातली गीते व पोवाडे गायले आहेत. गुरू ठाकूर आणि संदीप खरे यांनी गीते लिहिली आहेत. हा चित्रपट प्रेक्षकांना मनोरंजनाबरोबरच ठोस असा सामाजिक संदेश देईल, अशी आशा हॉटेल एमराल्ड पार्क येथे आयोजित पत्रकार परिषदेत घोलप यांनी व्यक्त केली. या वेळी जितेंद्र जोशी, अभिनेत्री मीता सावरकरही उपस्थित होते.
तीन वर्षांनी मराठीत पुन्हा अजय-अतुल
मराठी चित्रपटांमध्ये ‘नटरंग’सारख्या चित्रपटाला संगीत देऊन यश मिळवलेल्या अजय-अतुल यांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तीन वर्षांनी ‘भारतीय’ चित्रपटानिमित्त ही जोडी मराठीमध्ये पुन्हा एकदा आली आहे. देऊळच्या वेळेस इच्छा असूनही संगीत देण्यास न जमल्याने भारतीय या चित्रपटासाठी त्यांनी आपले जादुई संगीत दिले आहे.