आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठी चित्रपटांचीही पायरसी सैराट, काॅपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल हाेऊ शकताे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठी चित्रपट एकच धाटणीचे असल्याने यापूर्वी बाॅक्स अाॅफिसवर या चित्रपटांची फारशी चलती नव्हती. इतकेच नाही तर मल्टिप्लेक्समध्ये सुरुवातीच्या काळात मराठी चित्रपट दाखविलेही जात नव्हते. परंतु, असे चित्रपट दाखवणे शासनाने सक्तीचे केले, शिवाय मराठी चित्रपटांनीही हिंदी चित्रपटांना ताेडीसताेड कलाकृतींची निर्मिती केल्यामुळे अशा चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोटींची उड्डाणे घेतलेली आहेत. वेगवेगळ्या राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मराठी चित्रपटांचा बाेलबाला राहिला आहे. नावाजलेल्या मराठी चित्रपटांच्या यादीत गेल्या अाठवड्यापासून ‘सैराट’नेही अापला ठसा उमठावला अाहे. प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांची ही कलाकृती शुक्रवारी प्रदर्शित झाली अाणि संपूर्ण महाराष्ट्रात हाउसफुल गर्दीत चित्रपटरसिकांनी तिचे स्वागत केले.
चित्रपटातील प्रेमकथा, नवख्या कलाकारांचा दर्जेदार अभिनय, ग्रामीण भागातील चित्रण, अजय-अतुलची गाणी अाणि उत्कृष्ट दिग्दर्शन यामुळे रसिकांना या चित्रपटाने भुरळ पाडली. म्हणूनच गेल्या अाठवड्यापासून चित्रपटाचे तिकिटे मिळणे मुश्कील झाले अाहे. अनेकांनी दाेन दिवस अाधी तिकीट काढून चित्रपटाचा अास्वाद घेतला. पहिल्या अाठवड्यात २५ काेटींचा टप्पा गाठणारा हा अपवादात्मक मराठी चित्रपट ठरला. परंतु, या चित्रपटालाही पायरसीची दृष्ट लागली अाहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्यासह निर्मात्यांनी सैराट चित्रपटाची सेन्सॉर कॉपी लीक झाल्याची तक्रार केली अाहे. या प्रकरणी पुणे पोलिसांनी कारवाई करत पहिला गुन्हा दाखल केला आहे. पुण्यातील एका दुकानदाराविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा दुकानदार सैराट चित्रपटाची पायरेटेड कॉपी विकत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली असल्याचे सांगण्यात येते.

यूट्यूबवरही सेन्साॅर काॅपी लीक
प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलेल्या ‘सैराट’ चित्रपटाची कॉपी यूट्यूबवरही लीक झाली आहे. महत्त्वाचे म्हणजे, यूट्यूबवर चक्क सेन्सॉर कॉपी अपलोड करण्यात आली होती. या प्रकरणी दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी थेट पोलिसांत धाव घेतली. मंजुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेऊन या प्रकाराबाबत तक्रार दाखल केली आहे.

चित्रपटातील अर्थकारण कारणीभूत
यापूर्वी नऊ दिवसांत नानाचा ‘नटसम्राट’ २२ कोटी रुपयांच्या पार गेला होता. चौथ्या आठवड्यात हा आकडा ३५ कोटींच्या घरात गेला होता. दुसरीकडे ‘कट्यार काळजात घुसली’ या सिनेमाने पहिल्या आठवड्यात कोटी रुपयांची कमाई केली होती. तर, रितेश देशमुखच्या ‘लय भारी’ने चार दिवसांत १२.७० कोटी रुपयांचा गल्ला जमवला होता. रवी जाधव यांच्या ‘टाइपमास-२’नेदेखील पहिल्या दिवसांमध्ये तब्बल ११ कोटी रुपयांची कमाई केली होती. अाता ‘सैराट’नेदेखील पहिल्या सप्ताहात २५ काेटींपेक्षा अधिक कमाई केली अाहे.

^एक सिनेमाजेव्हा तयार हाेताे त्यावर स्पाॅटबाॅयपासून दिग्दर्शकापर्यंत अनेकांचे भवितव्य अवलंबून असते. पायरसीमुळे या सर्व कष्टांवर पाणी फिरते. पायरसी हाेणे ही बाब संपूर्ण चित्रपट क्षेत्रासाठीच घातक अाहे. त्यामुळे अाता रसिकांनीच नीतिमत्ता अाणि नियमशीर वागण्याचा संकल्प करावा. -चिन्मय उद्गीरकर, अभिनेता

खुलेअाम विक्री; तरी कारवाई का नाही?
^रेकाॅर्डब्रेक करणाऱ्या सिनेमाची पायरसी हाेते तेव्हा प्रचंड वाईट वाटते. पायरसी हाेऊ नये यासाठी कडक निर्बंध हवेत. रस्त्यावर कित्येक पायरेटेड सीडीज् खुलेअामपणे विकल्या जातात. अशा विक्रेत्यांवर नियमित कारवाई का हाेत नाही? सचिन शिंदे, चित्रपट दिग्दर्शक

मराठी प्रेक्षकच पायरसी राेखू शकताे
^पायरेटेड काॅपीमुळे निर्मात्याचे कराेडोंचे नुकसान हाेते. मुळात मराठी चित्रपट दाखविला जाताे ताे प्रांत हिंदीच्या तुलनेने फार छाेटा अाहे. त्यातही जर पायरसी झाली तर निर्माता मराठी सिनेमासाठी तयारच हाेणार नाही. मराठी प्रेक्षकच ही पायरसी राेखू शकतात. सुहास भाेसले, चित्रपट दिग्दर्शक

हे कटकारस्थानही असू शकते...
^मराठी सिनेमात खऱ्या अर्थाने मराठीपण अाणणारा अाणि मराठी सिनेमांची दिशा बदलणाऱ्या सैराटची काॅपी लीक हाेणे ही निषेधार्ह बाब अाहे. हे कटकारस्थान असावे.मराठी सिनेमा जगविण्यासाठी चित्रपटगृहात जाऊनच ताे बघावा. दत्ता पाटील, लेखकअाणि स्क्रीप्ट रायटर

थेट प्रश्न
सर्वसाधारण चित्रपट निर्मात्याला माेठा फटका
^मल्टिप्लेक्सचालकअाणि लॅबवाले यांच्यापासूनच पायरसीची गडबड हाेत असते. सैराटसारख्या चित्रपटाला त्याचा फटका बसताेच, शिवाय जाे सर्वसाधारण व्यक्ती सिनेमा बनवताे पण ताे फारसा चालत नाही, त्यालाही कमालीचा फटका बसताे. भारत सरकारनेच यात लक्ष घालावे. - श्याम लोंढे, कार्यवाह,अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, नाशिक शाखा

{ सन २०१२ मध्ये प्रदर्शित झालेला ‘शाळा’ अवघ्या काही दिवसांमध्ये यूट्यूबवर झळकला हाेता
{ ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’, ‘किल्ला’, ‘नटसम्राट’ या चित्रपटांची पायरसी झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे दाखल करण्यात आली होती.
{ ‘एलिझाबेथ एकादशी’ चित्रपटाच्या पायरसीसंदर्भातही पाेलिसांत गुन्हे दाखल करण्यात अाले हाेते.
{ ‘डाॅ. प्रकाश बाबा अामटे’ चित्रपटाच्या पायरसीच्या तपासात सायबर पोलिसांनी दोन जणांचा मागही काढला होता, परंतु आजपर्यंत या गुन्ह्यात काेणालाही अटक करण्यात अालेली नाही.
{ ‘टाइमपास २’, ‘एलिझाबेथ एकादशी’च्यावेळी पायरसीची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी लगोलग कारवाई करून पायरेटेड चित्रपट उपलब्ध असलेल्या साइट्स बंद पाडल्या होत्या.

अाता माेबाइल अॅप राेखणार पायरसी...
केवळ मराठी चित्रपटांसाठी एक विशिष्ट मोबाइल अॅप्लिकेशन विकसित करण्यात अाले असून, अाता या अॅप्लिकेशनच्या माध्यमातून पायरसी राेखण्यात यश येणार असल्याचा संबंधितांकडून दावा केला जात आहे. यामध्ये मराठी चित्रपटांची गाणी, व्हिडिओ, बातम्या आणि इतर गोष्टींचादेखील समावेश असणार आहे.

{ पायरसीबाबत अाणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे, अनेक हिंदी, मराठी चित्रपटांची कॉपी परदेशातदेखील विकली जाते, त्यामुळे परदेशातील सर्व्हरवर तो उपलब्ध हाेताे.
{ राज्य सरकार - केंद्र सरकार जोपर्यंत पायरसीविरोधात कडक धोरण तयार करत नाही, तोपर्यंत पायरसीचे हे प्रकार बिनदिक्कतपणे सुरूच राहतील, यात शंका नाहीे.
{ चित्रपट पायरसीबाबत अनेक धक्कादायक प्रकार समाेर येत अाहेत. सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडूनही पायरसी केली जात असल्याचा संशय व्यक्त हाेत अाहे.
एडिटिंग लॅब, तसेच सेन्सॉर बोर्डापर्यंत कुठलाही चित्रपट पोहोचवतानाही त्या चित्रपटाची पायरसी झाल्याची अाजतागायत अनेक उदाहरणे आहेत. यातील ‘सैराट’चे हे एक उदाहरण म्हणता येईल.
{अांतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवात संबंधित परीक्षक चित्रपटांच्या डीव्हीडी परीक्षणासाठी द्याव्या लागतात. या सीडीही बाहेर विकल्या जाण्याची शक्यता असते.
{सेन्सॉर बोर्डाच्या कार्यालयातील व्यक्तींकडून पायरसीला खतपाणी घातले जात असल्याचा संशय असल्याने या एकंदरीत प्रकाराबाबत नाराजी अाहे.
{ डाउनलोडिंग संकेतस्थळांचा शाेध घेण्यासाठी भारतीय तपास यंत्रणा प्रयत्नशील अाहेत. परंतु, परदेशी बनावटीच्या सर्व्हरचा वापर पायरसीत केला जात असल्याने पाेलिसांना तपास करण्यात अपयश येते.
चित्रपटाची पायरसी कशी हाेते?
{ चित्रपट क्षेत्रातील अंतर्गत स्पर्धेतूनही प्रतिस्पर्धी पायरसीला खतपाणी घालू शकताे. या क्षेत्रातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढू लागली अाहे. त्यामुळे असे प्रकार घडत असतील, असाही संशय अाहे.
दृष्टिक्षेपात असे...
गेल्या सप्ताहापासून हाउसफुल असलेल्या ‘सैराट’ चित्रपटाची सेन्सॉर काॅपी दाेन दिवसांपूर्वी लीक झाली अाणि बहुसंख्य नाशिककरांच्याही माेबाइल संचात तसेच पेन ड्राइव्हमध्ये ती डाउनलाेड झाली. या चित्रपटाच्या सीडीदेखील चाेरून-लपून विकायला काही मंडळींनी सुरुवात केली अाहे. ‘सैराट’ला पायरसीचा फटका बसल्याने चित्रपटांच्या पायरसीचा मुद्दा अाता पुन्हा ऐरणीवर आला आहे. ही सेन्सॉर काॅपी लीक झाल्यामुळे चित्रपट क्षेत्रातील चिंतेचे ढग अधिक गडद झाले अाहेत. अशा गैरकृत्यामुळे निर्मात्यांना तर फटका बसताेच अाहेच, शिवाय चित्रपट शाैकिनांनाही दर्जाहीन काॅपीवर समाधान मानावे लागते. यात चित्रपटातील कलाकारांची कलाकृतीही झाकली जाते. िवशेष म्हणजे, पायरसी समितीची अाजवर एकही बैठक झालेली नाही. एकूणच, ‘सैराट’च्या पायरसीमुळे निर्माण झालेला वाद अाणि पायरसीचा गाेरखधंदा यावर ‘डी. बी. स्टार’चा हा प्रकाशझाेत...
नाशिकमध्येही सेन्साॅर काॅपीचा धुमाकूळ; व्यवसायावर िवपरीत परिणाम हाेत असल्याच्या तक्रारी
{ पायरसीनिर्मूलन समितीच्या बैठका महिन्यातून एकदा हाेणे अपेक्षित असताना, अातापर्यंत किती बैठका झाल्या अाहेत?
-अाजवर नियमित बैठका झालेल्या नाहीत. मात्र, यापुढे त्या िनयमितपणे घेण्यात येतील.
{ पायरसीकरणाऱ्यांवर अातापर्यंत िकती गुन्हे दाखल करण्यात अाले अाहेत?
-अाजवर याविषयी तक्रारीच प्राप्त झाल्या नाहीत. त्यामुळे गुन्हेही दाखल झाले नाहीत. तक्रार अाल्यास तातडीने कारवाई करण्यात येईल.
{ पायरसीचागुन्हा काेणत्या कायद्यान्वये दाखल हाेताे?
-परवानगी नसताना सिनेमाची काॅपी बाळगणे अाणि प्रसारित करणे याबद्दल काॅपीराइट कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात येताे.
{ गुन्हासिद्ध झाल्यास कारवाईचे स्वरूप काय असते?
-दाेषी अाढळल्यास संबंधितास तीन वर्षांपर्यंत कारावास, ५० हजार रुपयांपर्यंत दंडाची तरतूद अाहे.
-------------------------------
बातम्या आणखी आहेत...