आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठमोळ्या मावळ्यांची ‘मराठी रियासत डॉट कॉम’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - युद्ध जिंकण्यासाठी राजाचे नेतृत्व भक्कम असावे लागते. पण अनेकदा प्राणांची आहुती देणारा असतो तो छोटा लढवय्या. हिंदवी स्वराज्य स्थापनेतही मिठाला जागणारे, प्रामाणिक आणि आपल्या राजासाठी, मराठी मातीसाठी अभिमानाने रक्त सांडणारे कमी नाहीत. अशा सर्व मावळ्यांना त्यांच्या गड-किल्ल्यांसह घेऊन येत आहे ‘मराठी रियासत डॉट कॉम’

छत्रपती शहाजीराजे, शिवबांनी रियासत भक्कमपणे उभी केली. त्याचेच आधारस्तंभ म्हणजे संताजी, धनाजी, तानाजी, बाजीप्रभू देशपांडे, मल्हारबा, सूर्यराव काकडे, ज्योताजी केसकर अशी शेकडो नररत्ने. यांच्या स्मरणाशिवाय मराठय़ांचा इतिहास पूर्ण होऊच शकत नाही. अशा अनेक ज्ञात-अज्ञात मावळ्यांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावी या उद्देशाने ई- साहित्य प्रतिष्ठान ‘मराठी रियासत डॉट कॉम’ ही मावळ्यांची इत्थंभूत माहिती असलेली पहिली वहिली वेबसाइट सुरू करत आहे. यात प्रत्येक मावळ्यावर एक-एक स्वतंत्र पुस्तिकावजा पेज बनवून हा इतिहास वाचकांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. या कार्यात सुमारे 40 तरुण लेखकांचा सहभाग असणार आहे. या वेबसाइटचे उद्घाटन रविवारी सायंकाळी 6 वाजता ठाण्याच्या सहयोग मंदिरात होणार आहे.

अशी असेल वेबसाइट
या वेबसाइटवर 10 सदरे देण्यात आली आहेत. मुखपृष्ठावर वेबसाइटबद्दल माहिती आहे. ई-पुस्तके या सदरात इतिहासाच्या पुस्तकांसह इतरही काही ई-पुस्तकांचा समावेश आहे. या वेबसाइटचे सर्वात महत्त्वाचे सदर म्हणजे ‘शिलेदार’. यात मावळ्यांची परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे. गनिमी कावा-युद्धतंत्र या सदरात राजे-महाराजांनी वापरलेली युद्धतंत्रे नोंदवली आहेत. दुर्ग दुर्गट भारी येथे ज्ञात-अज्ञात किल्ल्यांची माहिती तसेच या किल्ल्यांवर जावे कसे याची माहिती देण्यात आली आहे.