आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त दर्जा मिळून भाषा अभिजात हाेत नाही: डाॅ. विजया राजाध्यक्ष, मनाला भिडणारं मराठी लिहा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - काेणत्याही भाषेला फक्त अभिजाततेचा दर्जा मिळाला की ती भाषा अभिजात हाेते असे नाही. तर त्यासाठी त्या भाषकाला अापल्या बाेलण्यातून, वर्तनातून जास्तीत जास्त व्यक्त हाेता अालं पाहिजे. तेव्हाच ती भाषा अभिजात होते, हे माझे स्पष्ट मत अाहे, असे ज्येष्ठ लेखिका डाॅ. विजया राजाध्यक्ष म्हणाल्या.
 
मराठी साहित्य विश्वात मानाचा समजला जाणारा कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे देण्यात येणारा ‘जनस्थान’पुरस्कार डाॅ. राजाध्यक्ष यांना कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी अर्थातच मराठी भाषादिनी साेमवारी नाशिक येथे प्रदान करण्यात येणार अाहे. साेहळ्याच्या पूर्वसंध्येला त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. 

मराठी भाषेला अभिजाततेच्या दर्जाबद्दल त्या म्हणाल्या की, मराठीला अभिजाततेचा दर्जा मिळाला तरी तिची प्रगती व्हायला काळ जावाच लागेल. हे चित्र लगेच बदलणार नाही. तिचं स्थान लगेच कसे बदलेल. त्यासाठी संधी द्यावी लागेल. प्रत्येक मराठी भाषक जेव्हा भाषेतून व्यक्त हाेईल, तसे वर्तन करील तेव्हाच भाषा अभिजात हाेईल. केवळ निधी अाला आणि विनियोग झाला म्हणून भाषा प्रसार हाेणार नाही. थोडा काळ जाऊ द्या. कुसुमाग्रजांनीही कवितेत म्हणून ठेवलं अाहे की, माझ्या मराठी भाषेचा लावा ललाटास टिळा... 
 
मराठीतही सहभाषांचा लहेजा सांभाळला जाताे जशा इतर भाषा सांभाळतातच. पण लाेकांना वाटतं की, संस्कृतकडे झुकलेली मराठी म्हणजेच प्रमाण मराठी. पण तसं काही नसतं. साधी मराठी वापरा, साधे शब्द वापरा, साेपी भाषा लिहा, डिक्शनरी उघडून एखादा शब्द बघावा लागू नये अशी पारदर्शक मराठी असायला हवी. सरळ भिडणारंच मराठी लिहावं.... असे मत डाॅ. विजया राजाध्यक्ष यांनी व्यक्त केले. कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे साेमवारी (दि. २७) डाॅ. राजाध्यक्ष यांना जनस्थान पुरस्कार प्रदान करण्यात येणार अाहे. मराठी भाषा, साहित्य अाणि संमेलन याविषयी त्यांनी साधलेला हा संवाद...  
 
अाजची मराठी भाषा कुठे बघता ?  
- काही चांगले लेख, चांगल्या बाेलीभाषेतील लिखाण, दलित साहित्य असे भाषेतील वेगवेगळे रंग अाजही उलगडत अाहेतच की, ते अापण समजून घेतले पाहिजे. त्यातील एखादा शब्द अडला तर लगेच त्याचा बाऊ करता कामा नये तर त्याचा संदर्भ लक्षात येताेच. साहित्य संदर्भ जाणवत राहतातच. तुम्ही अाठवणींचे पक्षी बघा किंवा अानंद यादवांचं गाेतावळा वाचा, शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर यांचं लिखाण हे भाषेचा लहेजा दर्शवतंच की. या लाेकांनी शब्दप्रविष्ट भाषा लिहिली. त्यामुळे अाजही मराठीत भाषेचा लहेजा सांभाळला जाताेच अाहे. साधं सरळ लिहिलं की साेपं हाेतं. १९व्या शतकातील विचारवंतांनी म्हणजेच लाेकहितवादी, अागरकर, लाेकमान्य टिळक यांचे अग्रलेख बघा, कधी अडसर अाला नाही.   
 
इंग्रजी शब्दांचा वापर हाेताे...   
- का नकाे व्हायला... गरजेनुसार ताे हाेणारच. फक्त एक अाहे की, इंग्रजी शब्दांचे मराठीकरण खटाटाेपाने हाेऊ नये हा विचार त्यामागे असला पाहिजे. एकेकाळी सावरकरांनी मराठी भाषेसाठी, शब्दांसाठी चळवळ सुरू केली हाेती, किंवा माधव ज्युलियन यांची एक कविता बघा की शिवाजी महाराजांना अालेल्या एका पत्राला उत्तर देताना महाराज म्हणतात की, ‘फारसी मराठी मज  काेश पाठवावा’ म्हणजे भाषेतील ही सरमिसळ काही अाजचीच नाही. म्हणूनच अापल्याला जी भाषा येते ती सरळ लिहावी जी भिडली पाहिजे.   
 
साहित्यिकांतील फळीत एक अंतर पडले अाहे असे वाटते का?   
- खरं तर तसे नाहीये. त्या-त्या लेखकांचे, साहित्यिकांचे ऋणानुबंध असतात. भाैगाेलिक अंतरं असतात. खरं तर फळीबिळी मी मानत नाही. पुष्कळ चांगले लिहिणारे अाहेतच की. भारत सासणे, राजन खान, वसंत अाबाजी डहाके, प्रभा गणाेरकर, नीरजा, कल्पना दुधाळ अशी अनेक नावे घेता येतील. इंदिरा संत, किंबहुना बहिणाबाईंपासूनची ही परंपरा सांगता येईल की ती अाजतागायत सलगपणे पुढे जाते.   
 
माेठी कादंबरी ही कथाच असं एक तुमचं वक्तव्य मी वाचलंय..   
- हाेय... पूर्वी कादंबरी हा एक एेवज हाेता. तुम्ही फडके वाचा, खांडेकर वाचा, तुंबाडचे खाेत वाचा. ताे एक एेवज हाेताे. जेव्हा यातील एेवज नाहीसा हाेताे यात त्रुटिता यायला लागते. तुमच्या कादंबरीचा एेवज जर १०० पानांचा असला तरी चालेल; पण केवळ माेठं पुस्तक करायचं म्हणून त्यात फुटकळ पाने जाेडू नये असं मला वाटतं. तुम्ही नेमाडेंचे काेसला बघा अाणि हिंदू बघा... तुलना करणार कशी? मला तेच म्हणायचंय की, पृष्ठसंख्येवर तुलना नाही करता येत. छंदाेबद्ध कविता गेली अाणि अाता मुक्तछंद कविता अाली हे एक चांगले उदाहरण म्हणता येईल.   
 
कवितेच्या समीक्षणाकडे तुम्ही कसे बघता?   
- समीक्षक म्हणून बाेलायचं झालं तर सगळीच सरमिसळ दिसते. अनेक मासिकं येतात त्यात कवितांना अग्रक्रम असताे. माझं कवितेवर फार प्रेम अाहे. काही कविता अशा असतात की त्या पुन्हा पुन्हा वाचाव्या. मी शिकवताना मुलांना नेहमी म्हणते की, अाडवं लिहिण्याएेवजी उभं लिहिलं की ती कविता हाेत नाही. म्हणजे छंदाेबद्ध कविता हाेत नाही.   
 
तुम्ही इंदूरच्या संमेलनाच्या अध्यक्षा हाेतात, अाजच्या उत्सवी संमेलनांबद्दल काय वाटतं?   
-खरं तर समाजच उत्सवी झाल्यानंतर अशा संमेलनांवर त्याची सावली पडणारच ना? पण अशा संमेलनांतील परिसंवाद, कविता यासाठी त्या-त्या ठिकाणच्या स्थानिकांनाही व्यासपीठ मिळतं हे महत्त्वाचं नाही का? संमेलन श्रीमंत असतं त्याबद्दल अाेरड हाेते ठीक अाहे. सगळं चांगलं असावं; पण अशा गाेष्टींना दुय्यम स्थान असावं अाणि मराठी भाषेच्या मंथनालाच प्राधान्य मिळावं.   
 
अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर नेहमी खल हाेताे..  
मला असं वाटतं की, त्याचं काही कारण नाही. निवडणूक ही लाेकशाही पद्धतीने हाेते. जेव्हा मसाप किंवा इतर शाखांतील सभासद मतदान करतात तेव्हा एक एेवज तयार हाेत असताे अाणि ताे महत्त्वाचा असताे. याला पर्याय म्हणून मध्ये कुणीतरी चार-अाठ अध्यक्षांनी एकत्र येऊन अध्यक्ष निवडावा असं सांगितलं हाेतं. पण मग त्याने वाद हाेणार नाहीत का? हाेणारच. त्यामुळे अाहे ती पद्धत अधिक पारदर्शक केली तर साेपं हाेईल असं मला वाटतं.   
बातम्या आणखी आहेत...