आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्साहाची संपत्ती... धावले साथ सांगाती...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या दुसऱ्या राष्ट्रीय आणि सातव्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत पुरुषांच्या गटात मुंबईचा सेनादलाचा पारसकुमार, तर महिलांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये नाशिकच्या मोनिका आथरेने बाजी मारली. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉनमध्ये रमेशचंद्रसिंह शानदेरने प्रथम, तर नाशिकच्या कांतिलाल कुंभारने द्वितीय क्रमांक पटकावला. यंदाच्या स्पर्धेत अनेक नवीन विक्रम प्रस्थापित करण्यात आले. ऑलिम्पिक पदकविजेता नेमबाज गगन नारंग आणि मविप्र सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या हस्ते सर्व गटांमधील विजेत्यांना पुरस्कार देऊन गाैरविण्यात आले.

गगन नारंग यांच्या हस्ते रविवारी (दि. ४) सकाळी वाजता धावपटूंना हिरवा झेंडा दाखवून मविप्र मॅरेथॉनचा प्रारंभ करण्यात आला. या वेळी व्यासपीठावर सरचिटणीस नीलिमा पवार, सभापती अॅड. नितीन ठाकरे, डॉ. सुनील ढिकले यांच्यासह सर्व संचालक मंडळ, तसेच स्पर्धा निरीक्षक विजय बेंगाले, कल्पना तेंडुलकर आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी बोलताना गगन नारंग यांनी नाशिककरांचे खेळांवर असलेले प्रेम बघून खूपच आनंद वाटल्याचे सांगितले. कोणत्याही व्यक्तीने खेळात रस घेतला की तो आनंदी राहतो, आनंदी असलेला माणूसच देशाच्या प्रगतीत योगदान देऊ शकतो, असेही त्यांनी नमूद केले.

नेमबाजीनेमला सर्व काही दिले : माझ्याबालपणी क्रिकेटचीच क्रेझ होती. त्यामुळे मीपण क्रिकेट खेळायचो, बॅडमिंटन खेळायचो. एकदा सहज म्हणून शूटिंग रेंजवर गेल्यावर मला ते आवडू लागले. मी महिनाभर त्या रेंजवर दररोज जात होतो, पण कुणीच माझ्याकडे लक्ष द्यायचे नाही. अखेरीस एके दिवशी एका माणसाने मला विचारले की नेम लावून पाहतोस का? मी हो म्हणून नेम धरल्यावर तिसऱ्या-चौथ्या शाॅटलाच बरोबर नेम साधल्याने सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आणि मग मला सगळ्यांनी प्रोत्साहन दिले. तेव्हापासून जो नेमबाजीचा सराव करतोय तो अजूनदेखील सुरूच आहे. आता ज्या खेळाने मला इतके काही दिले त्या खेळाला, देशाला आपण काहीतरी द्यायला हवे, असे वाटल्यानेच मी पुण्यात बालेवाडीला गन फॉर ग्लोरी ही अकॅडमी सुरू केली आहे. त्या अकॅडमीतर्फे येत्या १५ जानेवारीपासून आठवडाभर कोणत्याही नवख्या मुलांना मोफत १० नेम मारण्याची संधी देऊन त्यातून प्रतिभा शोधण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचेही नारंग यांनी नमूद केले.
सकाळी वाजता सुरू झाली मॅरेथॉन
मराठाविद्या प्रसारक समाज संस्थेच्या दुसऱ्या राष्ट्रीय आणि सातव्या राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेस रविवारी सकाळी वाजता केटीएचएम महाविद्यालय (मॅरेथॉन चौक) येथून प्रारंभ झाला. गिरणारेपर्यंत जाऊन परत मॅरेथॉन चौकात समारोप झाला.
शिक्षक स्वयंसेवक आयोजनात सहभागी
२५०० गट स्पर्धेत सहभागी
१४ लाख रुपये पुरस्काराची रक्कम
७.५ हजार विद्यार्थी धावपटूंचा सहभाग