आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Marathwada Vidya Prasarak Archituctur College Permission Cancel Nashik

‘मविप्र’च्या आर्किटेक्चर कॉलेजची मान्यता रद्द

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या येथील कॉलेज ऑफ आर्किटेक्चरची मान्यता केंद्रीय कौन्सिल ऑफ आर्किटेक्चरने रद्द केल्याने 250 विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्या प्राजक्ता बस्ते यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या वतीने फोन घेतलेल्या व्यक्तीने प्राचार्या याबाबत उद्या खुलासा करणार असल्याचे सांगण्यात आले.

देशभरातील आर्किटेक्चर महाविद्यालयांवर केंद्र शासनांतर्गत कार्यरत दिल्ली येथील कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर या संस्थेचे नियंत्रण असते. या संस्थेने नुकत्याच केलेल्या पाहणीत देशातील पाच, तर राज्यातील तीन महाविद्यालयांनी किमान निकष व दर्जा पूर्ण केला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे त्यांची मान्यता आर्किटेक्चर अँक्ट 1972 नुसार काढून घेतली असून, त्यात मविप्रच्या आर्किटेक्चर महाविद्यालयाचा समावेश आहे.

हे आर्किटेक्चर महाविद्यालय एसआयटी आणि पुणे विद्यापीठाची मान्यताप्राप्त उत्तर महाराष्ट्रातील एकमेव महाविद्यालय असून, त्याचीच मान्यता काढल्याने महाविद्यालय आणि संस्थेबरोबरच विद्यार्थी व पालकांचेही धाबे दणाणले आहे. दरम्यान, याबाबत प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना बोलवून घेत याची कल्पना दिली आहे. तसेच येत्या दोन आवठड्यात मान्यता मिळविण्याचे आश्वासन दिल्याचेही समजते. मात्र, नुकतेच मेडिकलच्या 23 महाविद्यालयांच्या विरोधात मेडिकल कौन्सिलने दाखल केलेल्या याचिकेत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत या महाविद्यालयांची मान्यता काढण्याचा कठोर निर्णय घेतला आहे. यामध्ये 1800 विद्यार्थ्यांचा समावेश असतानाही न्यायालयाने हा निर्णय घेतल्याने आर्किटेक्चरच्या 250 विद्यार्थ्यांचा कितपत निभाव लागू शकतो, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

मान्याता काढलेली राज्यातील तीन महाविद्यालये :
मविप्रचे आर्किटेक्चर महाविद्यालय (नाशिक),
एमएमएस (पुणे)
सर विल्फ्रेड कॉलेज (पनवेल)