आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात स्वस्त वीज देणारच - मुख्यमंत्री फडणवीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘विदर्भ व मराठवाड्यातील उद्याेगांना स्वस्त वीज देण्याचे धाेरण सरकारने निश्चित केले अाहे,’ असे ठणकावून सांगतानाच ‘तुम्हाला स्पर्धेत टिकायचे असेल तर रात्रीच्या वेळी उत्पादन वाढवा,’ असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अाणि ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नाशिकसह उर्वरित महाराष्ट्रातील उद्याेजकांना दिला. ‘नवीन टीडीअार धाेरणही राज्य सरकारने ठरवून अाणले अाहे. त्यामुळे त्यातही बदल हाेणार नाही. छाेट्या बांधकाम व्यावसायिकांनी एकत्रित येऊन माेठे प्रकल्प उभारावेत, ज्यातून त्यांना स्पर्धेत टिकून राहता येईल,’ असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
विदर्भ व मराठवाड्यातील उद्याेजकांना वीज बिलात ३० टक्के सवलत देण्याचा सरकारचा विचार अाहे. मात्र, केवळ दाेनच विभागांना सवलत न देता संपूर्ण राज्यातील उद्याेगांसाठी एकच वीजदर असावा, अशी मागणी घेऊन नाशिकसह उर्वरित महाराष्ट्रातील उद्याेजकांचे शिष्टमंडळ बुधवारी मुख्यमंत्री, ऊर्जामंत्र्यांना भेटले. मात्र, ‘मराठवाडा व विदर्भातील उद्याेगांना सरकार एक रुपया प्रतियुनिटने स्वस्त दरात वीज देणारच अाहे,’ असे या दाेन्ही मंत्र्यांनी उद्याेजकांना ठणकावून सांगितले. ‘अातापर्यंत पश्चिम महाराष्ट्राला खूप काही िमळाले. विदर्भ व मराठवाड्यावर सातत्याने अन्याय हाेत राहिला,’ अशी पुष्टीही या वेळी मुख्यमंत्र्यांनी जाेडल्याचे उद्याेजकांच्या शिष्टमंडळातील ‘निमा’चे सरचिटणीस मंगेश पाटणकर यांनी सांगितले. दरम्यान, असा िनर्णय झाल्यास त्याविराेधात रस्त्यावर उतरूच तसेच न्यायालयातही याचिका दाखल करणार असल्याचे पाटणकर यांनी सांगितले.
दरम्यान, सरकारने अापल्या निर्णयावर ठाम राहून तसा निर्णय घेतल्यास उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातील उद्याेगांवर अन्याय हाेणार अाहे. नाशिकमधील स्टील उद्याेग थेट बंद पडतील, अशी भीतीही स्थानिक उद्याेजक व्यक्त करत अाहेत. त्याविराेधात दाद मागण्यासाठी स्थानिक लाेकप्रतिनिधी व उद्याेजकांची गुरुवारी बैठक अायाेजित करण्यात अाली अाहे. त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार असल्याचे सांगण्यात अाले.
टीडीअार धाेरणालाही विराेध, काेर्टात जाणार
नवीन टीडीअार धाेरणासही बांधकाम व्यावसायिक, अार्किटेक्ट, सिव्हिल इंजिनिअर्स असाेसिएशनचा विराेध अाहे. या पार्श्वभूमीवर अामदार देवयानी फरांदे, अामदार बाळासाहेब सानप, अामदार सीमा हिरे अादींच्या शिष्टमंडळाने बुधवारी मुख्यमंत्री, पालकमंत्री िगरीश महाजन यांच्याशी चर्चा केली. त्यावर हे धाेरण जर अन्यायकारक असेल तर बिल्डरांनी एकत्र येऊन माेठे प्रकल्प करावेत, जेणेकरून माेठ्या भूखंडांना असलेला जास्त टीडीअारचा लाभ मिळू शकेल, असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सिव्हिल इंजिनिअर्स असाेसिएशनचे अध्यक्ष विजय सानप यांनी सांगितले. मात्र टीडीअारच्या टक्केवारीसंदर्भात जरूर विचार केला जाईल, त्यासाठी प्रस्ताव सादर करा, असेही मुख्यमंत्र्यांनी सांिगतले. दरम्यान, नव्या टीडीअार धाेरणाविराेधातही बिल्डर काेर्टात जाणार अाहेत.