आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘एम फाॅर्म’मधील त्रुटीविराेधात माेर्चा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गर्भवती स्त्रियांच्या सोनोग्राफी तपासणीवेळी भरून घेतल्या जाणाऱ्या ‘एफ फॉर्म’मधील त्रुटींबद्दल डॉक्टरांना होणाऱ्या शिक्षेच्या विरोधात नाशकात सोनोग्राफी सेंटरचालकांनी गुरुवारी (दि. १) बंद पाळला. सोनोग्राफीबरोबरच एक्स-रे, सीटी स्कॅन, एमआरआय, मॅमोग्राफी अशा सर्व रेडिओलॉजी सेवा बंद ठेवत आयएमए हॉल येथून मोर्चा काढून महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात अाले. या निवेदनाद गर्भधारणापूर्व प्रसूतिपूर्व गर्भलिंगनिदान प्रतिबंधक कायद्यात सुधारणा करण्याची मागणी करण्यात अाली.

प्रत्यक्ष लिंगनिदान करणे कागदपत्रांतील किरकोळ त्रुटी या दोन्ही गोष्टींसाठी कायद्यात समान शिक्षा आहे, असा जुलमी कायदा बदलावा म्हणून गेली काही वर्षे शासन दरबारी केलेल्या अर्ज-विनंत्या सरकारने विचारात तर घेतल्या नाहीच, उलट प्रशासनाचा कामाचा देखावा उभा करता यावा म्हणून अधिकाधिक डॉक्टरांवर फॉर्ममधील किरकोळ चुकीसाठी फौजदारी खटले दाखल केले जात असल्याच्या निषेधार्थ रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनतर्फे गुरुवारपासून देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. या संपाला देशातील १५ राज्यांचा पाठिंबा असून शुक्रवार(दि. २)पासून सोनोग्राफी सेंटर बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत. गुरुवारी नाशिक रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनतर्फे सकाळी शालिमार परिसरातील आयएमए हॉल येथून पालिकेच्या मुख्यालयावर मोर्चा काढण्यात अाला हाेता. या कायद्यातील जाचक तरतुदींचा वापर शासकीय यंत्रणेकडून प्रामाणिक डॉक्टरांचा छळ करण्यासाठी केला जातोय. एखाद्या फॉर्ममधल्या किरकोळ चुकीसाठी निरपराध डॉक्टर तुरुंगात पाठवले जात आहेत. या घटनेच्या विरोधात निषेध नोंदवत या कायद्यात सुधारणा करण्याची मागणी असोसिएशनतर्फे करण्यात आली. शहरातील साेनाेग्राफी सेंटरचालक ३५० साेनाेग्राफी रेडिअाेलाॅजिस्ट सेंटर बंद ठेवण्यात अाले तर २७६ स्त्रीराेगतज्ज्ञ केंद्र बंद ठेवली हाेती. जिल्ह्यात दिड हजार सेंटर बंद हाेते. यावेळी इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर, रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनचे राज्य सहसचिव डॉ. मंगेश थेटे, एनआेजीएसच्या अध्यक्षा डॉ.निवेदीता पवार, जेष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. रविंद्र शिवदे, डॉ.विकास गोऱ्हे, डॉ. हेमंत कोतवाल, डॉ. राजेंद्र शिवदे, डॉ. मंजुशा कुलकर्णी, डॉ.विजय बर्वे, डॉ. गिरीश धडीवाळ,डॉ. अदिती वानखेडे, डॉ. किशोर भंडारी, डॉ. रविंद्र वाघ आदी उपस्थित होते.

शासनाचे धाेरण अतिशय चुकीचे : साेनाेग्राफीसंदर्भात शासन चुकीचे धाेरण अवलंबत अाहे. याचा फटका सामान्य रुग्णांना बसत अाहे. अाजार निदानासाठी ही यंत्रसामग्री असून त्याचा वैद्यकीय व्यवसायाशी थेट संबंध नाही. असे डाॅ. संजय वराडे यांनी सांगितले.

साेनाेग्राफी सेंटरचा बेमुदत बंद
गुरुवारी रेडिओलॉजी सेवा स्त्रीरोगतज्ज्ञ केंद्र बंद आंदोलनानंदर अाता शुक्रवार (दि. २)पासून देशभरात सोनोग्राफी सेंटर बेमुदत ठेवले जाणार असल्याची माहिती रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनने दिली.

असोसिएशनचे आमदारांना निवेदन
रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशनच्या वतीने शहरातील भाजपचे आमदार सीमा हिरे, बाळासाहेब सानप, प्रा. देवयानी फरांदे यांनाही निवेदन देऊन प्रतिबंधक कायद्यात सुधारणासाठी विधानसभेत प्रश्न मांडण्याची मागणी केली.
बातम्या आणखी आहेत...