आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माेर्चा फक्त भुजबळ समर्थकांचाच, सत्ताधारी भाजपच्या सूडबुद्धीविराेधात असंताेष

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - येत्या 3 अाॅक्टाेबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला जाणारा माेर्चा माळी, अाेबीसी अन्य काेणताही समाज वा पक्षाचा नसून, फक्त भुजबळ समर्थकांचाच असल्याचा पुनरूच्चार अायाेजकांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला. भुजबळांचा जामीन मंजूर हाेण्याची वेळ अाली की, सत्ताधारी भाजप तपासी यंत्रणांचा वापर करून न्याय व्यवस्थेवर दबाव अाणताे. त्यामुळेच न्यायव्यवस्थेच्या विराेधात नाही, तर भाजपच्या सूडबुद्धीच्या कारवाईविराेधात हा माेर्चा असल्याची अागपाखडही अायाेजकांकडून करण्यात अाली.

चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या भुजबळ समर्थक माेर्चाच्या पार्श्वभूमीवर अायाेजन समितीने नियाेजनाची माहिती दिली. यावेळी प्रतिनिधीक स्वरूपात माेर्चा मागचा उद्देशही स्पष्ट करण्यात अाला. प्रारंभी माळी समाजातील समर्थकांचा मेळावा काढण्याचे नियाेजन हाेते, मात्र भुजबळ यांचे समर्थक सर्वच जाती-पातीमध्ये असल्यामुळे केवळ समर्थक या झेंड्याखाली सर्वांना साद घालण्यात अाली. अाता भरभरून प्रतिसाद मिळत असून, महाराष्ट्रच नाही, तर देशभरातून भुजबळ यांना मानणारे समर्थक नेतेही उपस्थित राहणार अाहेत. माेर्चामागचा प्रमुख उद्देश म्हणजे केवळ सत्ताधारी भाजपकडून ज्यापद्धतीने भुजबळ यांना संपवण्याचा सुरू प्रयत्न अाहे, त्यास विराेध करणे हा अाहे. न्याय व्यवस्थेवर समर्थकांचा पूर्ण विश्वास असून, भुजबळ यांना न्यायालयाकडून नक्कीच न्याय मिळेल. मात्र, अाता ज्यापद्धतीने तपासी यंत्रणेचा खुबीने वापर करून भाजपकडून भुजबळ यांना अडकवले जात अाहे, ती बाब धक्कादायक अाहे. भाजपचे खासदार कारवाई हाेण्यापूर्वीच माध्यमांना जाहीरपणे माहिती देतात, याचाच अर्थ कुणाच्यातरी संगनमताने सर्व कारवाई सुरू अाहे. न्यायव्यवस्थेला विराेध करणे वा त्यांच्या कामात अाडकाठी अाणण्याचा काेणताही प्रयत्न नसून, यानिमित्ताने सात महिन्यांपासून तुरुंगात असलेल्या भुजबळ यांच्यामागे त्यांचे समर्थक खंबीरपणे उभे असल्याचेही दाखवून दिले जाणार अाहे. माेर्चात अाेबीसी, दलित, मराठा, हिंदू मुस्लिम समाजातील जवळपास १० लाख भुजबळ समर्थक उतरणार असल्याचा विश्वासही व्यक्त करण्यात अाला. यावेळी समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, व्ही. एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, बाळासाहेब कर्डक, ज्येष्ठ नेते जी. जी. चव्हाण, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, बाजीराव तिडके, जिल्हा परिषद सदस्य डॉ.भारती पवार, मीरमुख्तार अश्ररफी, छबू नागरे, लक्ष्मण धोत्रे, वामन गायकवाड, भारिप बहुजन संघाचे दीपचंद दोंदे, नाशिक महापालिका विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक,अमोल निकम, युवक कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे अादी उपस्थित हाेते.

कट्टर समर्थक चार हात लांबच
छगनभुजबळ यांचे कट्टर समर्थक म्हणून अाेळखल्या जाणाऱ्या अनेकांनी पत्रकार परिषदेला दांडी मारली. एरवी हमखास माध्यमांसमाेर येणारे चेहरेही यावेळी गायब झालेले हाेते. खासकरून राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या वजनदार पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत हाेती. यासंदर्भात विचारले असता, त्यांनी फक्त राष्ट्रवादीचाच माेर्चा नसून सर्वपक्षातील भुजबळ समर्थक येणार असल्याचे उत्तर देत अायाेजकांनी या प्रश्नावर मात्र पडदा टाकला.

घाेषणा देता मूकमाेर्चा काढा
अामदार पंकज भुजबळ यांनी पत्रक काढून शांततेच्यामार्गाने सरकारच्याविराेधात काेणत्याही घाेषणा देता मूकमाेर्चा काढावा असे अावाहन केले अाहे. भुजबळ साहेब आजारी आहेत. मात्र सरकार त्यांच्या तब्येतीची चांगली काळजी घेत असून, त्यांची तब्येत सुधारत आहे. या पार्श्वभूमीवर शासनविरुद्ध अथवा कोर्टाचा अवमान होईल अशा घोषणा वा भाषणे टाळावे असेही अावाहन केले अाहे.

साेशल मीडियावर जमवाजमव
शक्तिप्रदर्शनासाठीभुजबळ समर्थकांनी साेशल मीडियाचा पुरेपूर वापर केला अाहे. भुजबळ समर्थक युवकांकडून ‘वॉर रूम’ची स्थापना करण्यात आलेली आहे. एका दिवसात साधारण हजार पाठिंबा देणारे काॅल्स अाल्याचाही दावा यावेळी अायाेजकांनी केला.
बातम्या आणखी आहेत...