आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजारपेठेला लागले उत्साहाचे चार चाँद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- इस्लाम धर्मीयांचा त्याग व बलिदानाचा पवित्र सण असलेल्या ईद-उल्-अज्हा अर्थात बकरी ईदनिमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण आहे. बुधवारी (दि. 16) पारंपरिक पद्धतीने साज-या होणा-या या सणासाठी बाजारात 10 हजारांपासून तब्बल तीन लाखांपर्यंतचे बोकड विक्रीस आले आहेत.

बकरी ईददिनी शहरातील ऐतिहासिक शाहजहाँनी ईदगाह येथे सकाळी 10 वाजता खतीब-ए-शहर हाफिज हिसामुद्दिन मियाँ खतीब अशरफी यांच्या नेतृत्वाखाली सामुदायिक नमाजपठण होणार आहे. तसेच, ईदगाह येथे जाऊन ज्यांना नमाजपठण करणे शक्य नाही. अशा समाज बांधवांसाठी सकाळी 8.30 ते 9 दरम्यान शहरातील विविध मशिदींमध्ये विशेष नमाजपठण होणार आहे.

सलग तीन दिवस चालणा-या बकरी ईदच्या सणाची सांगता शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी होईल. कुर्बानीचा विधी पार पाडण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे शहरात 27 कुर्बानी केंद्रांना परवानगी देण्यात आली आहे. शहरातील या केंद्रांमध्येच बांधवांनी कुर्बानी करावी, असे आवाहन धार्मिक नेते अलहाज सय्यद मीर मुख्तार अशरफी यांनी केले आहे.

कुर्बानीचा विधी पार पाडताना अन्य धर्मीयांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घेण्याचे आवाहन ईदच्या पूर्वसंध्येला मुस्लिम धर्मगुरूंनी केले.


दरम्यान, जगभरातून लाखोंच्या संख्येने हज यात्रेसाठी पवित्र मक्का शरीफ येथे पोहोचलेल्या यात्रेकरूंची हज यात्राही मंगळवारी (दि. 15) पार पडणार आहे.