आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विभागीय अधिकार्‍याचे काम पार पाडले लिपिकाने

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - विवाह झाल्यानंतर महिन्याभरात विवाह नोंदणी करणे कायद्याने बंधनकारक केलेले आहे. विवाह नोंदणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने प्रत्येक विभागात सहायक निबंधक अर्थात विभागीय अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली ही नोंदणी करण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. मात्र, पूर्व विभागीय कार्यालयात विभागीय अधिकारी यांच्या गैरहजेरीतही लिपिकामार्फत विवाह नोंदणी झाल्याची धक्कादायक बाब ‘दिव्य मराठी’च्या चमूने बुधवारी केलेल्या पाहणीत समोर आली आहे.

विवाह सोहळ्यातील सप्तपदीनंतर विवाह नोंदणीसाठी सरकारी कार्यालयात चकरा मारण्याची वेळ नवविवाहितांवर ओढवते. यामुळे शहरातील सहाही विभागात विवाह नोंदणीची सुविधा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे. विवाह नोंदणी करताना तसेच अर्जावर वधू-वर व साक्षीदार स्वाक्षरी करताना सहायक निबंधक उपिस्थत असणे गरजेचे आहे. मात्र, बुधवारी सकाळपासूनच पालिकेच्या विभागीय अधिकारी मालिनी शिरसाट नाशिकरोड विभागात गेलेल्या असताना दविसभर अर्ज भरण्याचे तसेच विवाह नोंदणीची कामे सुरूच होती. सकाळपासूनच नवविवाहित जोडप्यांनी तसेच साक्षीदारांनी मोठी गर्दी केली होती.याठिकाणी ‘दिव्य मराठी’च्या चमूने तपासणी केली असता लिपिक वविेक जाधव हे अर्जावर वधू-वर व साक्षीदारांचे स्वाक्षरी घेत असल्याचे दिसून आले. दरम्यान, विभागीय अधिकारी कुठे गेल्या आहेत, अशा प्रश्न विचारला असता मॅडम नाशिकरोडला बैठकीस गेल्या असल्याचे जाधव यांच्याकडून सांगण्यात आले.
विभागीय अधिकारी नसताना विवाहाची नोंद
कायद्यानुसार विवाह नोंदणीच्या वेळी विभागीय अधिकारी अथवा सहायक निबंधकांसमोर वधू-वर व तीन साक्षीदार यांची स्वाक्षरी होणे गरजेचे असते. मात्र, बुधवारी विभागीय अधिकारीविनाच चार विवाहांची नोंदणी झाल्याची माहिती विवाह नोंदणी विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली.