आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फेब्रुवारीत विवाहांसाठी सर्वाधिक 13 मुहूर्त

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - यंदाचे वर्ष शुभ आणि सर्वोत्तम मुहूर्तांचा खजिनाच घेऊन आले आहे. त्यातील 58 दिवस विवाहांचे मुहूर्त असून, रविवारपासून पुन्हा एकदा लग्नांचा धूमधडाका सुरू झाला आहे.
फेब्रुवारीत विवाहाचे सर्वाधिक मुहूर्त अर्थात 13 दिवस शुभ आहेत. 45 दिवस कोणत्याही शुभकार्यांसाठी चांगले आहेत. त्यातील 21 दिवस इतके उत्कृष्ट आहेत की, या दिवशी वाहन आणि अन्य कोणतीही खरेदी करणे उत्तम ठरेल, असे ज्योतिषांचे म्हणणे आहे. त्याचबरोबर वसंत पंचमी, अक्षयतृतीया, अक्षयनवमी, धनत्रयोदशी आणि दिवाळी इत्यादी सणांच्या मुहूर्तांवरदेखील शुभ कार्य आणि खरेदी करता येईल.
नवीन वर्षाची सुरुवातच शाकंभरी नवरात्रीने झाली आहे. पंडित अतुल कुलकर्णी यांनी सांगितल्यानुसार शुभ मुहूर्तांवर गृहप्रवेश, जमीन खरेदी, गृह खरेदी, वाहन आणि दागदागिन्यांची खरेदी करणे फलदायक होईल.
विवाह मुहूर्त
१> जानेवारी - 15, 17, 18, 19, 20, 27, 28, 29
२> फेब्रुवारी - 2, 3, 8, 9, 10, 11, 13, 15, 17, 18, 19, 24, 25
३> मार्च - 1, 2, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13
४> एप्रिल- 14, 18, 19, 22, 25, 26
५> जून- 14, 24, 27, 28, 29
६> नोव्हेंबर- 24, 28, 29, 30
७> डिसेंबर- 4, 5, 6, 7, 8, 9