आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवविवाहितेच्या संशयास्पद मृत्यूनंतर चिंचखेडला तणाव, सासरच्‍यांवर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वणी - लग्नास अवघे अकरा महिने पूर्ण हाेत नाही ताेच तालुक्यातील चिंचखेड येथील नवविवाहिता प्रियंका महेश फुगट (२३) हिचा मृतदेह शेततळ्यात आढळून आल्याने तणाव निर्माण झाला. 
 
मुलीच्या मृत्यूस जबाबदार नवरा सासरच्यांवर गुन्हा दाखल करून अटक केल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्याची भूमिका माहेरच्यांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला. अखेर पाेलिस बंदाेबस्त दंगल नियंत्रण पथकाने तणावावर नियंत्रण मिळवल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात अाले. 

दरम्यान, याप्रकरणी वणी पाेलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नाेंद करण्यात अाली असून रात्री उशिरापर्यंत अात्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू हाेते. चिंचखेड शिवारातील बेलबाग मळा परिसरात राहणारी विवाहिता प्रियंकाचा मृतदेह शनिवारी दुपारी शेततळ्यातील पाण्यात तरंगताना नातेवाईकांना आढळला. नातेवाईकांनी मृतदेहाला त्वरीत पाण्याबाहेर काढून पिंपळगाव येथे खासगी रुग्णालयात नेले.त्यानंतर तिला नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात नेले असता डाॅक्टरांनी मृत घोषित केले. 
 
बातम्या आणखी आहेत...