आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक शहरातील मेनरोड, होळकर पुलावर ‘मसाला’ चित्रपटाचे चित्रीकरण

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अभिनेत्री अमृता सुभाष व अभिनेता गिरीष कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका असलेला आरभाट संस्था निर्मित ‘मसाला’ चित्रपट एप्रिलमध्ये प्रदर्शित होणार आहे. मंगळवारी शहरातील गंगाघाट, मेनरोड, व्हिक्टोरिया पुलावर या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले. नाशिककर रसिकांनी चित्रीकरण पाहण्यासाठी गर्दी केली होती.
प्रसिद्ध दिग्दर्शक संदेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मसाला’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. चित्रपटाला आनंद मोडक यांनी संगीत दिले असून, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त एच. एम. रामचंद्र हे सिनेमॅटोग्राफी करीत आहेत. चित्रपटात डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आनंदासाठी जगणे महत्त्वाचे नाही तर आनंदाने जगणे महत्त्वाचे असल्याचा संदेश चित्रपटाच्या माध्यमातून देण्यात आल्याची माहिती अभिनेता गिरीष कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरही रसिक ‘मसाला’ आवर्जून पाहतील, असा विश्वास अमृता सुभाष यांनी व्यक्त केला.