Home | Maharashtra | North Maharashtra | Nashik | master mind of Petrol pump robbery in mla son

शहर भाजप महिला नेत्याचा पुत्र पेट्रोलपंप दरोड्याचा सूत्रधार; 20 दिवसांपूर्वीच शिजला कट

प्रतिनिधी | Update - Oct 12, 2017, 09:31 AM IST

राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर सिनेस्टाइल पद्धतीने दुचाकीला धडक देत दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून,

 • master mind of Petrol pump robbery in mla son
  इंदिरानगर- राणेनगर येथील सुमन पेट्रोलपंपावर सिनेस्टाइल पद्धतीने दुचाकीला धडक देत दरोडा टाकणाऱ्या सहा आरोपींना अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार नाशिकरोड येथील भाजप महिला आघाडी शहर चिटणीस भारती मोगल यांचा मुलगा आहे. आरोपींकडून दाेन लाख ४५ हजार रु., इनोव्हा अाणि स्विफ्ट या चारचाकी गाड्यांसह एक पल्सर असा १६ लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात अाला अाहे. क्राइम ब्रँच युनिट ने अवघ्या २४ तासांत घटनेचा तपास करून अाराेपींना पकडले. दरोड्याचा प्लॅन २० दिवस आधीच ठरल्याचेही उघड झाले अाहे.

  मुख्य सूत्रधार स्वप्नील अनिल मोगल (२६) इलेक्ट्राॅनिक्स इंजिनिअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिकताे. दरोडा टाकण्याआधी या पेट्रोलपंपाची परिसराची बारकाईने पाहणी करण्यात आली हाेती. एखाद्या देमार हिंदी सिनेमात शाेभेल अशा पद्धतीने सहा मित्रांनी माेबाइल कॉन्फरन्स घेऊन प्लॅन तडीस नेला. सोमवारी (दि. ९) सकाळी ११ वाजता हिंदुस्थान पेट्राेलियमच्या या पंपावर काम करणारी नीलिमा शिंदे ही महिला कर्मचारी तीन लाख ७६ हजार रुपयांचा भरणा करण्यासाठी बँकेत जात असताना तिच्या दुचाकीला धडक देऊन रोख रक्कम असलेली बॅग लांबवण्यात अाली हाेती.

  पोलिस आयुक्त डाॅ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली उपआयुक्त विजय मगर, परिमंडळ चे उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे सहाय्यक आयुक्तअशोक नखाते यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवून आरोपींना केली. गुन्हे शाखा युनिट चे निरीक्षक निलेश माईनकर, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, कर्मचारी योगेश सानप, बाळासाहेब नांद्रे, रवींद्र सहारे, राजेंद्र जाधव, संजय ताजणे, देवकिसन गायकर, परमेश्वर दराडे, योगेश कुटे या गुन्ह्याचा छडा लावला. गुन्ह्यांमध्ये वापरलेली दोन चारचाकी वाहने एका दुचाकी वाहनाचा क्रमांकही बदलण्यात आला आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना सात दिवसांची पोलिस कोठवडी देण्यात आली.


  स्वप्नील मोगलने पेट्रोलपंपावरील माजी कर्मचारी शैलेश उदावंत याला हाताशी धरून नाशिकरोड परिसरातील बादशहा शेख, काझीम अस्लम शहा, मोईनुद्दीन सय्यद, रोहित केदारे यांच्या साह्याने ही रक्कम लुटली. पूर्वनियोजित कटानुसार शैलेश उदावंत वेतन मागण्याच्या बहाण्याने पंपावर गेला. त्याने नीलिमा शिंदे बँकेत भरणा करण्यासाठी जात असताना आपल्या साथीदारांना माेबाइलद्वारे कळवले. त्यानंतर पंपापासून दीडशे मीटरवर सर्व्हिसराेडवर मोईनुद्दीन सय्यदने स्विफ्ट गाडीने दुचाकीला धडक देऊन खाली पाडले पल्सरवर आलेल्या रोहित केदारे बादशहा शेख यांनी शिंदे यांच्याजवळ असलेली तीन लाख ७६ हजार १४५ रुपयांची रक्कम असलेली बॅग हिसकावून पलायन केले.
 • master mind of Petrol pump robbery in mla son
  दुचाकीवर मागील बाजूस असलेला क्रमांक पुढील बाजूस बदलला हाेता.
 • master mind of Petrol pump robbery in mla son
  दुचाकीवरील पुढील बाजूस बदललेला क्रमांक
 • master mind of Petrol pump robbery in mla son
  दराेड्यासाठी वापरलेली दाेन चारचाकी वाहने जप्त करण्यात अाली अाहेत.

Trending