आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभियांत्रिकीच्या ५० विद्यार्थ्यांना दत्तक घेणारी ‘मातोश्री'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रतिकूल काैटुंबिक परिस्थितीवर मात करून प्रतिभा मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना मातोश्री महाविद्यालयाने सुरू केलेल्या विद्यार्थी दत्तक योजनेतून आर्थिक बळ मिळाले आहे. मोलमजुरी करून चांगले गुण मिळवलेल्या ५० विद्यार्थ्यांच्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाचा खर्च हे महाविद्यालय करणार अाहे.

मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेजतर्फे मागील वर्षीपासून विद्यार्थी दत्तक योजना सुरू झाली अाहे. हलाखीच्या परिस्थितीत चांगली गुणवत्ता मिळवलेल्या विद्यार्थ्यांच्या उच्चशिक्षणाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी गरीब मुलांची निवड केली जाते. त्यांचे शिक्षण शुल्क महाविद्यालय भरत असून, वसतिगृहासाठी प्राधान्याने सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. वर्षाला २० ते २२ लाख रुपयांचा खर्च करून या ५० विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाचे स्वप्न साकार केले जात अाहे.

वसतिगृहाचीही सुविधा
या योजनेत मागील वर्षी २३ मुलांची निवड करण्यात आली होती, तर या वर्षी तब्बल ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली अाहे. निवड झालेले बहुतांश सर्व मुले ग्रामीण भागातीलच असल्याने त्यांना वसतिगृहाची सुविधा प्राधान्याने उपलब्ध करून दिली जाते. यंदा ३० मुलांना प्राधान्याने वसतिगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.
‘कमवा व शिका’चा लाभ
या विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच दोन पैसे मिळावे, या उद्देशाने त्यांची निवड पुणे विद्यापीठाच्या ‘कमवा व शिका’ योजनेतून करण्यात येते. त्यातून प्रत्येक तासासाठी तीस रुपये मानधन दिले जाते. महाविद्यालय व विद्यापीठाकडून प्रत्येकी ५० % मानधन दिले जाते, त्यामुळे विद्यार्थ्यांना अार्थिक मदत हाेते.
डॉ. गजानन खराटे, प्राचार्य, मातोश्री कॉलेज