नाशिक - मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या विचाराची आज गरज असून तरुणांनी त्यांच्या धाडसीपणाचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन मुख्याध्यापिका शिरीन सय्यद यांनी केले.
जुने नाशिक येथील रहेबर-ए-तालीम संस्था संचलित रेहनूमा उर्दू शाळेत मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या वेळी रहेबर-ए-तालीम संस्थेचे अध्यक्ष विकार पिरजादा, शिक्षिका यास्मिन शेख, तबस्सूम शेख, नुसरत खान, तनजीन शेख, सामाजिक एकता परिषदचे टिपू रजा आदी उपस्थित होते. याप्रसंगी दिवसभर विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे तसेच सामूहिक कुराण पठणाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचा या उपक्रमास चांगला प्रतिसाद लाभला.