आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कायदे धन्नासेठच्या सोयीचे : मायावती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती, नाशिक - ‘देशात भांडवलदार, उद्योजक आणि ‘धन्नासेठ’ यांच्याकरिताच कायदे बनवण्यात येतात. त्यांच्या मदतीनेच आजवर काँग्रेस, भाजपने देशाची सत्ता हस्तगत केली. त्यांच्यापासून सुटका करायची असेल, तर आता सोळाव्या लोकसभेत काँग्रेस, भाजप दोघांनाही सत्तेपासून रोखायला हवे’, असे आवाहन बहुजन समाज पक्षाच्या नेत्या, उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी गुरुवारी व नाशकातील सभेत केले.

गुजरातमध्ये दंगे घडवल्याचा आरोप असलेले नरेंद्र मोदी यांना भाजपने पंतप्रधानपदाचा उमेदवार घोषित केले, तर पुढचा पंतप्रधान ‘युवराज’ होईल अशी काँग्रेसला आशा आहे, असे सांगत मायावती यांनी दोघांनाही विरोध दर्शवला.

राज्यातील बसपच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मायावती यांची अमरावती व नाशकात जाहीर सभा झाली. ‘ देशाच्या हलाखीच्या परिस्थितीला फक्त काँग्रेसच जबाबदार आहे. केंद्राच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची पत घसरली. अद्यापही काळा पैसा भारतात आणण्यात काँग्रेसला यश आले नाही. भ्रष्टाचार थांबवण्यासाठी केलेले सर्व कायदे कुचकामी आहेत’, असा आरोपही मायावतींनी केला.

आरक्षण संपवण्याचा डाव
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शोषित, पीडित आणि दलितांकरिता आरक्षण कायदा लागू करून सुविधा दिल्यात. मात्र, सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने नवनवे नियम लादून दलित जनतेचा आरक्षणाचा हक्क हिरावून घेण्याचा प्रयत्न चालवला आहे. दलितांसाठी सरकारी नोकरीत असलेले आरक्षण हळूहळू संपवण्याचा काँग्रेसचा डाव आहे, असा आरोप मायावती यांनी केला.