आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mayor Ashok Murtadaka, Latest News In Divya Marathi

"जिओ'चे अनुकरणीय कार्य राज्यभरात पोहोचवावे, प्रदर्शनाच्या उद‌्घाटनप्रसंगी महापौर अशोक मुर्तडक यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- समाजातीलगरजू महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहता यावे, यासाठी "जिओ' संस्थेतर्फे राबविले जाणारे उपक्रम अनुकरणीय आहेत. जिओ शॉपीच्या माध्यमातून महिलांना व्यवसायवृद्धीची संधी मिळत असल्याने हा उपक्रम शहरापुरता मर्यादित राहाता राज्यभरात राबविला जावा, असे प्रतिपादन महापौर अशोक मुर्तडक यांनी केले.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर गृहोपयोगी वस्तूंपासून दैनंदिन वापरासाठी आवश्यक विविध वस्तूंची मोठी मालिका एकाच छताखाली आणि वाजवी दरात उपलब्ध व्हावी, या हेतूने जिओ (जैन इंटरनॅशनल वूमेन्स ऑर्गनायझेशन) संस्थेने गंगापूररोड येथील चोपडा बँक्वेट हॉलमध्ये दोनदिवसीय प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनाच्या उद‌्घाटनाप्रसंगी महापौर मुर्तडक बोलत होते. उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी महापालिकेच्या सहभागासोबतच महिला बालविकास विभागामार्फत निधी उपलब्ध करून देऊ, असे अाश्वासन दिले. अशोका बिल्डकॉनचे चेअरमन अशोक कटारिया, "जितो'चे अध्यक्ष वर्धमान लुंकड, हिरो होंडा मोटर्सचे शरद शाह, विक्रीकर आयुक्त सुमेरकुमार काले, विराज इस्टेट्सचे संचालक विलास शाह, स्काय लॅण्ड डेव्हलपर्सचे संचालक जयेश सराफ, अादेश शाह, अपर जिल्हाधिकारी तथा मुद्रांक जिल्हाधिकारी रमेश काळे, ‘एमटीडीसी’च्या नयना गुंडे, संघपती मोहनशेठ साखला, "जिवो'च्या अध्यक्षा अाशा लुंकड, उपाध्यक्षा सुवर्णा काले, माजी अध्यक्षा शिल्पा शाह आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
दररोज सकाळी १० ते रात्री १० वाजेदरम्यान सुरू राहणाऱ्या या प्रदर्शनात एकूण ८४ स्टॉल्सचा समावेश आहे. यापैकी १४ स्टॉल्स अंध अपंग, मूक-बधिर यांना मोफत देण्यात आले आहेत. प्रदर्शनात रेअर क्राफ्ट, कीड्स वेअर, महिलांसाठी कुर्तीज, ड्रेस मटेरियल्स, फॅन्सी स्वेटर्स, ज्वेलरी, होमअप्लायन्सेस, विविध बॅग्ज, पर्सचेही कलेक्शन उपलब्ध आहे. या स्टॉल्समध्ये फराळासह दिवाळीसाठीच्या निरनिराळ्या वस्तूंचा समावेश आहे.
या वेळी जितो अॅपेक्सचे संचालक सतीश पारख, चंदुलाल शहा, जैन सेवा संघाचे अध्यक्ष जे. सी. भंडारी, विजयकुमार कासलीवाल, प्रवीण शाल, सुनील चोपडा, उज्ज्वला लुणावत, आशा कटारिया, सरला पटणी, शोभा पारख, कल्पना पटणी, रंजना शहा, ऊर्मी झालावत, आशा गोलिया, वंदना लोहाले, सुनीता बोहरा आदी उपस्थित होते. दरम्यान, उद‌्घाटनावेळी मान्यवर सहभागी सदस्यांनी हरितकुंभाची शपथ घेतली.
बाहेरील विक्रेतेही सहभागी
प्रदर्शनातस्थानिक सदस्यांसह हैदराबाद, इंदोर, अहमदाबाद, बंगलोर, पुणे, औरंगाबाद येथील जिओ सदस्यांनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. त्यामुळे महिलांसाठीचे वस्त्र, दागिने, कलाकुसरीच्या वस्तू जैन फूड उपलब्ध यांत असंख्य व्हरायटी उपलब्ध झाल्या आहेत.