आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक महापौर निवडणूक: शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी उमेदवार देण्याच्या तयारीत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेत १२२ पैकी ६६ जागा मिळवून स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपची महापाैरपद उपमहापाैरपदासाठीची वाटचाल निर्धाेक असली तरी शिवसेना काँग्रेसने सरळ माघार घेण्याएेवजी उमेदवार देऊन निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली अाहे. दरम्यान, शिवसेनेकडून उमेदवार द्यावा की नाही, याबाबत रात्री ‘माताेश्री’वरून मार्गदर्शन अपेक्षित हाेते, तर काँग्रेस राष्ट्रवादीने अाघाडीद्वारे दाेन्ही पदांसाठी अाव्हान देण्यासाठी विचारविमर्श सुरू हाेता. 

भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे यंदाच्या महापाैर उपमहापाैरपदाच्या निवडणुकीत फारसा भरणार रंग नाही, हे स्पष्टच अाहे. गुरुवारी (दि. ९) अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असून बुधवारी सायंकाळपर्यंत एकही अर्ज दाखल नव्हता. भाजपकडून महापाैरपदासाठी रंजना भानसी, तर उपमहापाैरपदासाठी प्रथमेश गिते यांनी अर्ज नेले; मात्र हे दाेघेही गुरुवारीच अर्ज दाखल करण्याची शक्यता अाहे.
 
भाजपकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी अर्ज दाखल करणार नाही, असा अंदाज हाेता; मात्र सायंकाळी काँग्रेस, राष्ट्रवादी अपक्ष निवडणुकीला सामाेरे जाता माघारीची बाब भूषणावह नसल्यामुळे उमेदवार देण्याच्या निर्णयाप्रत अाले. त्यातून काँग्रेसकडून महापाैरपदासाठी अाशा तडवी तर उपमहापाैरपदासाठी राष्ट्रवादीच्या सुषमा पगारे यांचे अर्ज दाखल करावे, याबाबत चर्चा सुरू हाेती. 
 
मनसे-अपक्ष तटस्थ राहणार: महापाैर उपमहापाैर निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत असल्यामुळे विराेधी पक्षांनी एकत्र येऊन संख्याबळ जुळत नसल्यामुळे मनसे अपक्ष तटस्थ राहण्याची शक्यता अाहे. मात्र, स्थायी समिती शिक्षण, महिला बालकल्याण समितीवर जागा मिळवण्यासाठी एकमेकांना साथ दिली जाण्याची शक्यता अाहे. 
 
शिवसेनेचे लक्ष ‘माताेश्री’कडे 
महापालिकानिवडणुकीत शिवसेना भाजप एकमेकांसमाेर हाेते. अाजघडीला सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेची काेणतीही मदत घेण्याची भाजपला गरज उरलेली नाही. अशा परिस्थितीत विराेधी पक्षाच्या भूमिकेत शिवसेना बसणार की मुंबई महापालिकेत ज्याप्रमाणे भाजपने शिवसेनेला मदत केली त्याची परतफेड म्हणून नाशिक महापालिकेत भाजपला मदत करायची, याबाबत उत्सुकता वाढली अाहे. यासंदर्भात शिवसेना पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी ‘माताेश्री’कडे बाेट दाखवत मार्गदर्शन मागवल्याचे सांगितले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...