आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापाैरपदासाठी निवडणूक मार्चच्या दुसऱ्या सप्ताहात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महापालिकेच्या ३१ प्रभागांतील १२२ जागांवर निवडून अालेल्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे राजपत्र प्रसिद्धीसाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू झाली असून, गेल्या दाेन दिवसांपासून मंत्रालयात तळ ठाेकल्याचे सांगितले जाते. दरम्यान, राजपत्र प्रसिद्धीनंतर गटनाेंदणी अन्य प्रक्रिया सुरू हाेणार असून, साधारण मार्चच्या दुसऱ्या अाठवड्यात महापाैरपदाची निवडणूक हाेऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे अाहे. 
 
महापालिका निवडणुकीचा २३ फेब्रुवारी राेजी निकाल लागला. निकालानंतर नवनिर्वाचित नगरसेवकांना निवडणूक अायाेगाच्या वतीने प्रमाणपत्र देण्यात अाले. मात्र, संबंधित नगरसेवकांचे एकत्रित राजपत्र प्रसिद्ध झालेले नाही. हे राजपत्र प्रसिद्ध नसल्यामुळे राजकीय पक्षांना पक्षांतरबंदी कायद्याच्या अनुषंगाने विभागीय अायुक्तांकडे गटनाेंदणी करता अालेली नाही. दरम्यान, असे राजपत्र प्रसिद्धीसाठी महापालिकेने अावश्यक ती जमवाजमव करून मंत्रालयात तळ ठाेकला अाहे. मंगळवारी राजपत्र प्रसिद्धीनंतर पुढील प्रक्रियेसाठी मार्ग माेकळा हाेणार अाहे. दरम्यान, राजपत्र प्रसिद्धीनंतर पालिकेकडून विभागीय अायुक्तांना प्रस्ताव पाठवला जाईल. या प्रस्तावात महापाैर, उपमहापाैर निवडणुकीबाबत तारीख मागितली जाईल. महापालिकेच्या विद्यमान पंचवार्षिकची मुदत १५ मार्चपर्यंत असून, त्याअाधी नवनिर्वाचित नगरसेवकांमधून महापाैर, उपमहापाैरांची निवड करणे क्रमप्राप्त अाहे. साधारण १४ मार्चपर्यंत महापाैर, उपमहापाैर निवडणूक हाेईल, असेही सूत्रांनी सांगितले. 
 
बातम्या आणखी आहेत...