आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मनसेचे पर्यटन, काँग्रेसमध्ये रण, भाजपच्या नगरसेवकांची नेत्यांच्या दौ-यामुळे झाली धावपळ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापौरपदाच्या निवडणुकीने राजकीय वातावरण तप्त असून, घडामोडींना वेग आला आहे. मनसेच्या गुजरात दौ-यावरील नगरसेवकांनी शुक्रवारी पर्यटनाचा आनदं लुटला, तर खर्चावरून राष्ट्रवादीची सहल रद्द झाली आणि राष्ट्रवादीबरोबर स्वकीयांच्या गद्दारीच्या मुद्यावरून गाजलेल्या सभेनंतर काँग्रेसच्या नगरसेवकांनी वेगळी चूल मांडण्याची तयारी केली. त्यात काँग्रेस नगरसेवकांमध्येच वादाचे रणही पेटल्याचे वृत्त आहे.
या सर्व घडामोडीत शिवसेना नगरसेवक इगतपुरीजवळील एका रिसॉर्टमध्ये सहलीनिमित्त विसावले, तर भाजप नगरसेवकांची नेत्यांच्या दौ-यामुळे धावपळ झाली. निर्णायक ठरणारे अपक्षांचे नेते मात्र पालिकेत निवांतपणे फिरून राजकीय हालचालींचा निरोपाचा कानोसा घेत होते. महापौरदाची निवडणूक १२ सप्टेंबरला होत असून, या पार्श्वभूमीवर मनसेचे ३५ नगरसेवक अहमदाबाद येथील हॉटेल फॉर्च्युन येथे मुक्कामी आहेत. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शुक्रवारी समझोता होऊ शकला नाही. तशीच अवस्था शिवसेनेची होती.
अपक्षांचा पालिकेत तळ
सहानगरसेवक असून, अत्यंत निर्णायक स्थितीत सर्व पर्याय खुले ठेवणारे अपक्ष नेते मात्र पालिकेत व्यस्त होते. गटनेते गुरुमित बग्गा ज्येष्ठ नगरसेवक संजय चव्हाण यांनी मागील निवडणुकीतील किश्श्यांना उजाळा देत अधिका-यांकडील कामे मार्गी लावली.
काँग्रेसमध्ये पेटला वाद
राष्ट्रवादीलापाठिंबा देण्याच्या मुद्यावरून काँग्रेसमध्ये वाद झाल्याचे वृत्त आहे. उत्तम कांबळे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत काही नगरसेवकांनी राष्ट्रवादीसाेबत आघाडी करू नये, असा प्रस्ताव ठेवला. मागील निवडणुकीत सर्व जुळवाजुळव झाल्यावर तटस्थ राहण्याचे आदेश शरद पवार यांनी दिल्याची आठवण एका नगरसेवकाने करून दिली. त्यावर एका नगरसेविकेच्या पतीने ज्येष्ठ नगरसेवकाला सुनावत तुम्ही स्थायी समितीत तेच केल्याची जाणीव करून दिली. त्यानंतर ज्येष्ठ नगरसेवकाने बैठक नगरसेवकांची असून, त्यात तुमचा संबंध काय, असा सवाल केला. त्यानंतर संबंधित नगरसेविकेसह दोघांनी माजी आम मदाराकडे धाव घेतली. त्यानंतर संबंधित आमदाराने तुमच्या सोयीप्रमाणे निर्णय घ्या, असा सल्ला दिल्याचे समजते.