आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पक्षादेश झुगारणारे नगरसेवक शेलार, शिंदेंविरोधात ‘मनसे’चा अर्ज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड- महापौर,उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेश धुडकावून विरोधी पक्षाला मतदान करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दोघा नगरसेवकांना अपात्र ठरवावे, या मागणीचा अर्ज गटनेते अशोक सातभाई यांनी दाखल केलेला अर्ज सोमवारी दुपारी विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी दाखल करून घेतला.विभागीय आयुक्तांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले असून, प्रथमच महापालिकेत निवडून आलेल्या नीलेश शेलार शोभना शिंदे यांच्या अडचणी वाढणार आहेत.
महापौर उपमहापौर पदासाठी दि. 12 सप्टेंबरला निवडणूक पार पडली. मनसेतर्फे महापौर पदासाठी अशोक मुर्तडक, तर उपमहापौर पदासाठी गुरुमित बग्गा यांना उमेदवारी दिली होती. पक्षाच्या 40 नगरसेवकांना समक्ष लेखी स्वरूपात कळवून पक्षादेश बजावला होता. असे असताना नगरसेवक नीलेश शेलार शोभना शिंदे यांनी मनसेचे उमेदवार अशोक मुर्तडक यांच्याऐवजी विरोधी उमेदवार सुधाकर बडगुजर, तर उपमहापौरपदाच्या निवडणुकीत गुरुमित बग्गा यांच्याऐवजी संभाजी मोरुसकर यांना हात वर करून मतदान केल्याने पक्षादेशाचा भंग झाला. नगरसेवक शेलार शिंदे यांच्यावर महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणाच्या सदस्यांची अनर्हता नियम 1987 चा कलम नुसार सदस्य म्हणून राहण्यास अपात्र झाल्याचे अर्जाद्वारे नमुद केले. विभागीय आयुक्तांकडून मुदतीत कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे.
पक्षादेश बजावला
निवडणुकीपूर्वीसंपर्कात नसलेल्या शेलार यांच्या पत्नी आशा शेलार यांचेवर पक्षादेशाची बजावणी केली. मात्र, त्यांनी स्वाक्षरीस नकार दिल्याने पक्षादेशाची दुसरी प्रत त्यांच्या घराच्या दरवाजावर पंचांसमक्ष चिटकवून पंचनामा केला. शिंदे यांच्या घरी तोच अनुभव आल्याने त्यांच्या घराच्या दरवाजावर प्रत चिटकवून पंचनामा केला. अशोक सातभाई, गटनेतेमनसे
सबळ पुरावे आहेत
मनसेच्यानिशाणीवर निवडून आलेल्या नीलेश शेलार, शोभना शिंदे यांची विभागीय आयुक्तांकडे रीतसर नोंदणी झाली असून, त्यांनी महापौर उपमहापौर पदाच्या निवडणुकीत पक्षादेशाचा भंग केल्याचे सबळ पुरावे आहेत. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकारणाच्या सदस्यांची विभागीय आयुक्तांकडे अर्जाद्वारे अनर्हता नियम 1987 चे नियम प्रमाणे अपात्रतेची मागणी केली.- सतीश भगत