आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयुक्‍तांचे \'मिशन सिंहस्‍थ\', नियुक्‍त झाल्‍या-झाल्‍याच कामाचा निपटारा सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंहस्थकुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर माझी आयुक्तपदावर नियुक्ती झाली असून, आठ महिनेच हाती उरल्यामुळे आतापासूनच कामांची सद्यस्थिती प्राधान्याने घ्यायची कामे, याचा अभ्यास सुरू केला आहे. येत्या तीन दिवसांत महत्त्वाच्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून नियोजन केले जाईल, असे महापालिकेचे नवीन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. गेडाम यांनी सोमवारी (दि. १०) पदभार स्वीकारल्यावर खातेप्रमुखांची तातडीची बैठक घेत कामकाजाची माहिती घेतली. आयुक्तांच्या या धडाक्याने पालिकेतील सुस्तावलेल्या अधिकाऱ्यांची चांगलीच धावपळ झाली.
डॉ. गेडाम यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर लगेचच शहराची एकूण स्थिती, प्रश्न पालिकेची माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, नवीन शहर समजावून घेण्यासाठी मला काही अवधी लागेल. सिंहस्थ दैनंदिन कामे अशा दोन पद्धतीत कामाची रचना केली जाईल. सिंहस्थासाठी आठ महिने बाकी असल्याने त्यांनी सर्व अधिकाऱ्यांकडून बैठकीत आढावा घेतला. सकाळी १० ते रात्री वाजेपर्यंत ते कार्यालयात होते. पाहणी दौऱ्यातून कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असेल. पाहणी दौऱ्यानंतर कामाचे प्राधान्यक्रमही ठरवले जातील, असेही त्यांनी सांगितले. साधुग्राम, रस्ते, वैद्यकीय सुविधा, पूरस्थिती, मलनिस्सारण, घनकचरा व्यवस्थापन आदींची माहितीही त्यांनी घेतली.

महापालिकेचे नूतन आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी पदाची सूत्रे हाती घेताच सोमवारी पहिल्याच दिवशी साधुग्राममधील कामांची स्थिती जाणून घेतली.
शंभर टक्के करवसुलीचे लक्ष्य
महापालिकेचीआर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे करवसुलीसाठी काही वेगळे करणार का, असे विचारल्यावर त्यांनी वेगळे करण्याची काहीच गरज नसून, उत्पन्नस्रोत करवसुली शंभर टक्के करण्याचा प्रयत्न असेल, असे स्पष्ट केले. एलबीटी रद्द होण्याच्या भीतीमुळे व्यापारी कर भरीत नसल्याकडे लक्ष वेधताच त्यांनी शासनाचे धाेरण बघून वसुलीसाठी प्रयत्न करू, असे सांगितले.
दबाव सहन करणार नाही
पालिकेतयापूर्वी अनेकदा आयुक्त लाेकप्रतिनिधी यांच्यात नियमबाह्य कामांवरून संघर्ष उडाला होता. या पार्श्वभूमीवर कामकाजात कोणाचा हस्तक्षेप झाल्यास काय भूमिका असेल, असे विचारले असता चांगल्या सूचनांचे स्वागत केले जाईल. मात्र, कोणाचाही दबाव सहन केला जाणार नाही, असे डॉ. गेडाम यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थेत काम करण्याचा यापूर्वी चांगला अनुभव असल्याचा टाेलाही त्यांनी लगावला.
आयुक्तांनी महत्त्वाचे प्रशासकीय फेरबदलही केले जातील, असे सुरुवातीलाच सांगितले होते. त्या अनुषंगाने वर्षानुवर्षे महत्त्वाच्या खात्यात टेबलवर ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांची खांदेपालट करणार का, असा प्रश्न विचारला असता त्यांनी ठाण मांडून बसलेले गरज म्हणून ठेवलेल्यांचा शोध घेऊन बदल केले जातील, असे सांगितले. महापालिका शासन अखत्यारीतील जिल्‍हा प्रशासनातील कार्यपद्धती वेगळी आहे. तीन वर्षांनी बदल्या करण्याचा कायदा असला तरी मुळात महापालिकेत मात्र तसे करण्यात अडचणी येतात, असे त्यांनी स्पष्ट केले. जिल्‍हा प्रशासनात एका तालुक्यातून दुसऱ्या तालुक्यात कर्मचाऱ्याची बदली झाली तरी कामाची पद्धत एकच असल्यामुळे फारशा अडचणी येत नाहीत. याउलट पालिकेत पाणीपुरवठा विभागातील कर्मचाऱ्याला नगररचना विभागात बदलून चालत नाही, असेही त्यांनी सांगितले. फार तर ठाण मांडून बसलेले कोण हे लक्षात घेऊन बदल करता येईल, असेही त्यांनी सांगितले.