आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुस्त प्रशासनाला महापौरांचा ‘स्वाइन अॅलर्ट’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - डेंग्यूने शहरात धुमाकूळ घातल्याची आठवण ताजी असतानाच स्वाइन फ्लूबाबत आरोग्य वैद्यकीय विभागाने माहिती दडवल्याच्या पार्श्वभूमीवर महापौर अशोक मुर्तडक यांनी दाेन्ही अधिका-यांची झाडाझडती घेतली. शहरातील आरोग्य व्यवस्थेला धाेका पाेहोचेल अशी माहिती दडवू नका माहिती पुरविण्यात कुचराई करणा-या खासगी रुग्णालयांवर प्रसंगी कारवाई करा, असा सज्जड दमही त्यांनी भरला. याव्यतिरिक्त पालक संस्था म्हणून महापालिकेने विशेष स्वाइन फ्लू कक्ष तपासणी पथकेही शहरात पाठवावी, अशी सूचना त्यांनी केली.

महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय विभागाच्या सावळ्या गोंधळामुळे नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये डेंग्यूचा प्रादुर्भाव झाला होता. उन्हाळा सुरू होण्याची चाहूल लागताच आता शहरात स्वाइन फ्लू डोकेवर काढण्याची भीती आहे. सातपूरमधील अशोकनगर भागात एका महिलेला स्वाइन फ्लू झाल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच महापौरांनी आरोग्याधिकारी डॉ. सुनील बुकाने वैद्यकीय अधीक्षक डॉ. बी. आर. गायकवाड यांना धारेवर धरले. स्वाइन फ्लूची साथ पसरणार नाही, अशी खबरदारी घेताना त्याचे रुग्ण आढळल्यास तत्काळ माहिती देण्याचे आदेश दिले.खासगी रुग्णालयांना नोटिसा : डेंग्यूचाप्रादुर्भाव होण्यामागे खासगी रुग्णालयांचा हलगर्जीपणाही कारणीभूत ठरल्याचे आरोप झाले होते. या पार्श्वभूमीवर सर्व रुग्णालयांना नोटिसा पाठविण्याचे आदेश महापौरांनी दिले. त्यातून प्रत्येक रुग्णालयाने दरराेज स्वाइन फ्लूचे संशयित रुग्ण किती, याची माहिती वैद्यकीय विभागाला पाठवावी, असे बंधन आहे.
पाचरुग्ण, ३६ जणांना टॅमी फ्लू : जानेवारीमहिन्यात शहरात दोन, ग्रामीण भागात दोन, तर परजिल्ह्यांतील एक असे पाच रुग्ण स्वाइन फ्लूने बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ३६ संशयित रुग्णांना टॅमी फ्लू देण्यात आल्याचे वैद्यकीय विभागाने स्पष्ट केले.

कार्डियाक व्हॅन करा सुरू
३८लाख रुपये खर्च करून महापालिकेने घेतलेल्या कार्डियाक व्हॅन तातडीने सुरू करण्याचे आदेश महापाैर मुर्तडक यांनी वैद्यकीय अधीक्षकांना दिले. सद्यस्थितीत ही व्हॅन भांडार विभागात धूळ खात पडून आहे. स्टाफ नसल्याचे कारण वैद्यकीय अधिका-यांनी दिल्यानंतर मग वाहन खरेदी कसे केले, असा जाबही त्यांनी विचारला. दरम्यान, तातडीने उद्यापासूनच वाहन सुरू करण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना महापौरांनी केल्या.

दहा ठिकाणी होणार तपासणी
बिटकोरुग्णालय, कथडा रुग्णालय, इंदिरा गांधी मोरवाडी रुग्णालय, तसेच सहाही विभागांत प्रत्येकी एक याप्रमाणे स्वाइन फ्लू स्क्रीनिंग सेंटर सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले. याव्यतिरिक्त वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांचे भरारी पथक तयार करून घरोघरी जाऊन तपासणी करण्याच्या सूचना महापौरांनी दिल्या. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे फिरत्या दवाखान्यांमध्येही स्वाइन फ्लूचे रुग्ण शोधण्याचे आदेश देण्यात आले आहेत.