आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर्डात साचले तळे, तरीही महापौर ‘कोरडे’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महापालिकेने पावसाळापूर्व कामे न केल्यामुळे मान्सूनच्या सलामीनेच ओकाची तालीम व सराफ बाजार परिसरात सुमारे चार फूट पाणी साचून व्यापार्‍यांचे नुकसान झाले. त्यातच, वॉर्डाचे नगरसेवक असलेले महापौर यतिन वाघ यांनी ढुंकूनही न पाहिल्याने व्यापारी-रहिवाशांनी सोमवारी संताप व्यक्त केला.

परिसरातील नाल्यांवर असलेल्या लोखंडी जाळ्यांची छिद्रे माती व कचर्‍यामुळे बंद होती. त्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही व पाण्याची पातळी वाढत गेली. दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापार्‍यांची धावपळ झाली. मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. एवढी मोठी घटना घडूनही महापौर तेथे पाहणीसाठी गेले नाहीत अथवा प्रतिनिधीही पाठविला नाही, याबद्दल व्यापार्‍यांनी संताप व्यक्त केला. व्यापार्‍यांनी स्वत:हूनच नाल्यांमधील कचरा काढून पाण्याला तात्पुरती मोकळी वाट करून दिली. या प्रकारामुळे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पूर्णत: कोलमडल्याचे दिसून आल्याचे मत व्यापार्‍यांनी व्यक्त केले.