आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काझीगढी प्रकरण मुख्यमंत्र्यांकडे, भिंतीसाठी निधी मंजुरीची नगरसेवकांनी केली मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गेल्या दोन वर्षांपासून सुरू असलेले काझी गढीच्या संरक्षक भिंत बांधण्याचे प्रकरण शनिवारी नाशिक दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कोर्टात गेले. आगामी सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर संरक्षक भिंत बांधण्याची परवानगी देण्याची मागणी स्थानिक नगरसेवक नैया खैरे नगरसेविका रंजना पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे केली.
काझीगढी परिसरातील अनेक कुटुंबांना सध्या घर कोसळून पडण्याच्या भीतीने ग्रासले आहे. गोदावरीच्या शेजारील शेकडो फूट उंचीच्या कड्यावर वसलेली अनेक घरांची माती ढासळू शकते, अशी परिस्थिती आहे. दरवर्षी थोड्या-थोड्या प्रमाणात कोसळणाऱ्या या कड्यामुळे गढीची जमीन कमी होत आहे. परिणामी, अनेकांवर बेघर होण्याची वेळ येत आहे. तसेच, गेल्या दीड वर्षात तिसऱ्यांदा काझी गढी खचल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरवर्षी काझी गढीचा काही भाग कोसळत असल्याने त्या भागातील रहिवाशांना आता सवयच झाली आहे. गेल्या वर्षी गढी कोसळल्यानंतर प्रशासनाच्या वतीने या भागात संरक्षक भिंत बांधण्याची तयारी प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात अाली होती. मात्र, माती परीक्षण इतर कामांसाठी निधी उपलब्ध झाल्यामुळे गढीच्या कामांना ब्रेक मिळाला. मुख्यमंत्र्यांनी काझी गढीच्या संरक्षक भिंतीसाठी विशेष निधी उपलब्ध करून देऊन भिंतीचे काम सिंहस्थापूर्वीच करावे, अशी मागणी नगरसेवक नैया खैरे नगरसेविका रंजना पवार यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली.
सिंहस्थात भिंत उभारा
- आगामी कुंभमेळ्यात गोदाघाटावर जगभरातून हजारो भाविक येणार आहेत. काझी गढी जर सिंहस्थादरम्यान पडली, तर मोठी दुर्घटना होऊ शकते. गढीची भिंत सिंहस्थाआधीच बांधण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
नैया खैरे, नगरसेवक
बातम्या आणखी आहेत...