आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीए समुपदेशन फेरी; १३ हजार विद्यार्थी पात्र, तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे २१, २२ जुलैला फेरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण संचालनालयातर्फे मास्टर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन अर्थात एमबीए एमएमएस या अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत समुपदेशन फेरीचे आयोजन करण्यात आले असून, राज्यातील सहा विभागात येत्या २१, २२ जुलै रोजी ही फेरी पार पडणार आहे. त्यासाठीचे वेळापत्रक जाहीर झाले असून, नाशिक विभागासाठी महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था संचलित पंचवटी येथील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅण्ड रिसर्च सेंटर महाविद्यालयात समुपदेशन केंद्र देण्यात आले आहे.

एमबीए अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेंतर्गत समुपदेशन फेरी होणार असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून १०० शुल्क आकारण्यात येईल. तसेच या प्रवेश फेरीत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांनी डीटीई मुंबई येथे देय असलेला धनादेश सोबत आणणे आवश्यक आहे; तर अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना हे शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे जाहीर करण्यात अाले अाहे. नाशिक विभागासाठी एमजीव्हीज् आरएमआर कॉलेजमध्ये समुपदेशन केंद्र असून, पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह या फेरीत सहभागी होऊन अापला एमबी अभ्यासक्रमाचा प्रवेश निश्चित करावा, असे अावाहन संस्थेचे सहसचिव डॉ. व्ही. एस. मोरे प्राचार्य, केंद्रप्रमुख डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी केले आहे.

अशी हाेणार समुपदेशन फेरी...
समुपदेशनफेरीसाठी राज्यातील सहा केंद्रांवर तब्बल १३ हजार विद्यार्थी पात्र राहणार आहेत. २१ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता मेरिट क्रमांक ते २००० तर दुपारी १.३० वाजेनंतर २००१ ते ८००० अाणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी सकाळी ८००१ ते १४०००, तर दुपारी १४०१ ते २७९६२ या मेरिटनुसार समुपदेशन फेरी पार पडणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...