आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'एमबीए'ची प्रवेश परीक्षा मार्चमध्ये

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तंत्रशिक्षण संचालनालयाच्या वतीने २०१५ व २०१६ या शैक्षणिक वर्षासाठी मास्टर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन (एमबीए) व मास्टर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (एमसीए) अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन प्रवेश परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. एमबीए, एमएमस, पीजीडीबीएम आणि पीजीडीएमत प्रवेश घेऊ इच्छिणा-या विद्यार्थ्यांसाठी १४ व १५ मार्च रोजी ऑनलाइन परीक्षा होईल. त्यानंतर ‘एमसीए'च्या प्रथम आणि द्वितीय वर्षासाठी २९ मार्च रोजी परीक्षा होणार आहे. मागील वर्षी राज्यात एमबीएच्या तब्बल तीन हजार जागा रिक्त राहिल्या. अधिक माहितीसाठी
www.dtemaharashtra.gov.in वर संपर्क साधावा.