आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एमबीबीएसला वाढीव गुणांसाठीचा प्रस्ताव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून दिले जाणारे अधिकचे पाच गुण वेगवेगळ्या विषयांत विभागून देण्याची परवानगी मिळावी, असा प्रस्ताव विद्यापीठाने मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाकडे पाठविला आहे. पुन्हा तो सादर केला जाईल, असे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांनी सांगितल्याने एकापेक्षा अधिक विषयात एक-एक गुणांनी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.

एमबीबीएस अभ्यासक्रमांना वाढवून दिले जाणारे पाच गुण एकाच विषयासाठी दिले जातात. त्यामुळे दोन किंवा अधिक विषयांत एकाच गुणाने नापास झालेल्या विद्यार्थ्यांना त्याचा लाभ घेता येत नाही; परंतु एकाच विषयात पाच गुण कमी पडलेल्या विद्यार्थ्याला त्याचा अधिक फायदा होतो. त्यामुळे यात विद्यार्थ्यांचे नुकसान होते. शिवाय बीडीएस, बीएमएचएस, बीएचएमएसला हे गुण विभागून दिले जातात. केवळ एमबीबीएसवरच अन्याय का, असा प्रश्न उपस्थित होत असून, त्यात बदल करण्याची मागणी होत होती.

त्यानुसार कुलगुरूंनी यापूर्वीच मेडिकल कौन्सिलला पत्र लिहिले होते; मात्र त्यात निर्णय न झाल्याने आणि विद्यार्थ्यांचा वाढता दबाब लक्षात घेता कुलगुरूंनी पुन्हा एकदा कौन्सिलला पत्र लिहून हा निर्णय त्वरित लागू करण्याची विनंती करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे एकापेक्षा अधिक विषयांत केवळ एक-दोन गुणांनी अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पाच गुण विभागून मिळाल्याने उत्तीर्ण होण्याची संधी अधिक वाढली आहे.