आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळू संपकऱ्यांपुढे पालिकेचे लाेटांगण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सिंहस्थकुंभमेळ्यानिमित्त सुरू असलेल्या अखेरच्या टप्प्यातील अनेक कामे कथित वाळू संपकऱ्यांकडून बंद पाडण्याचे प्रकार सुरू केले असून, त्याची धग वाढल्यावर अाता काेठे महापालिका िजल्हा प्रशासनाने कठाेर पावले उचलण्याची तयारी सुरू केल्याचे समजते. संबंधित अांदाेलकांविराेधात गुन्हे दाखल करण्यापर्यंत विचार सुरू असला तरी या संघटनेत काम करणाऱ्यांचे राजकीय वजन बघता त्यांच्यासमाेर लाेटांगण घातले जात असल्याची खंत प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी खासगीत व्यक्त करीत अाहेत.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर जवळपास अडीच हजार काेटींची कामे सुरू अाहे. एकट्या महापालिकेमार्फत अकराशे काेटी रुपयांची कामे सुरू अाहेत. यात रस्त्यांबराेबरच साधुग्राम, घाट दुरुस्ती वगैरे तसेच काही ठिकाणी जमीन सपाटीकरण, काँक्रिटीकरण अशा कामांचा समावेश अाहे. यातील अनेक कामे अखेरच्या टप्प्यात असताना वाळू संपकऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे प्रशासनाची चांगलीच काेंडी झाली अाहे. खासकरून साधुग्राम, घाट बांधकामांची कामे अखेरच्या टप्प्यात असताना येथील कामे जवळपास ठप्प झाली अाहेत. काही ठिकाणी वाळूअभावी कामे बंद झाली अाहेत, तर काही ठिकाणी ठेकेदारांनी विशिष्ट ठिकाणी साठवून ठेवलेली वाळू कामाच्या स्थळापर्यंत अाणण्यात अडचणी अाणल्या जात असल्यामुळे काेंडी निर्माण झाली अाहे.
वाळू वाहतूकदारांनी शनिवारी संप पुकारल्यानंतर संघटनेशी संबंधित असल्याचे सांगत काही अज्ञात संपकऱ्यांनी पंचवटी परिसरातील वाळूची वाहतूक बंद करून ठेकेदारांना धमकावल्याच्या तक्रारी येत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे अाहे.

विशेष म्हणजे, या ठेकेदारांनी स्वत: साठवून ठेवलेली वाळूची वाहतूक करण्यासही मज्जाव केला जात असल्यामुळे हा एकप्रकारे दडपशाहीचाच प्रकार असल्याचे बाेलले जात अाहे. एवढेच नव्हे, तर एमअायडीसीतून वाळू खडी यांचे मिश्रण असलेले काेल्ड मिक्स हाॅट मिक्सच्या गाड्याही थांबवल्या जात असून, काही चालकांना मारहाण झाल्याचे बाेलले जात अाहे. असाच प्रकार डांबराच्या गाड्यांबाबत असून, केवळ नाशिकच नाही तर तालुक्यातील अन्य भागात जाणाऱ्या गाड्या अडवून त्यांनी प्रशासकीय यंत्रणेमार्फत पकडून देण्यासारख्या खेळ्याही त्यांच्याकडून खेळल्या जात असल्याचे सांगितले जाते. एकूणच परिस्थिती अावाक्याबाहेर जात असल्याचे बघूनही प्रशासन ढिम्मच असल्याची खंत काही अधिकाऱ्यांकडून व्यक्त हाेत अाहे.

प्रशासनही दबावात
संपकऱ्यांमध्येमाेठ्या प्रमाणात राजकीय पक्षातील वजनदार व्यक्तीही अाहेत. खुद्द स्थायी समितीचे सभापती अॅड. शिवाजी चुंभळे हेच नाशिक बिल्डिंग मटेरियल असाेसिएशनचे अध्यक्ष असून, स्वत: चुंभळे यांच्याकडून काेणतीही अडवणुकीची भाषा केली जात नसली तरी त्यांच्याअाडून काही वाळू ठेकेदार प्रशासनावर दबाव टाकत असल्याचे सांगितले जाते. खुद्द चुंभळे यांनी काेणाची अकारण अडवणूक करू नका, असेही अावाहन केले अाहे. एकीकडे कामे मंजूर करणारे लाेकप्रतिनिधीच दुसरीकडे कामांना अडचणी अाणणारेही त्यांच्याशी संबंधितच असल्यामुळे या संपकऱ्यांना कसे थाेपवायचे, असा प्रश्न अधिकारी विचारात अाहे. या पार्श्वभूमीवर मंत्रालयातून कसा ताेडगा निघताे, हे बघून प्रशासन भूमिका ठरवणार अाहे.
फाैजदारी कारवाईचे अस्त्र
महापालिकाप्रशासनाने अकारण शासकीय कामात अडथळे अाणणाऱ्यांविराेधात फाैजदारी कारवाईचे अस्त्र उभारण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यापूर्वी महापालिकेची जागा बळकावणाऱ्यांिवराेधात तसेच महापालिकेचे दरवाजे बंद करून काेंडी करणाऱ्या अांदाेलकांविराेधात फाैजदारी कारवाईचा पवित्रा अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम यांनी घेतला हाेता. महसूल खाते वाळू ठेकेदार यांच्या वादात महापालिका वेठीस धरली जात असताना सिंहस्थाच्या दृष्टीने वेळेत काम पूर्ण करण्याची डेडलाईन असताना अशा पद्धतीने दबाव टाकणाऱ्यांविराेधात गुन्हे दाखल करण्याचे ताेंडी अादेशही दिल्याचे समजते.