आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात टिप्पर गँगच्या सदस्यांवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहरातील कुख्यात टिप्पर गँगच्या सदस्यांविरोधात अखेर मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. आठ दिवसांपूर्वी एका फळविक्रेत्याला पिस्तूलचा धाक दाखवत पाच लाखांची खंडणीची मागणी करणाऱ्या गँगच्या सराईत गुन्हेगारांच्या अंबड पोलिसांनी तब्बल ३६ तासांचे सर्च ऑपरेशन राबवत मुसक्या आवळल्या होत्या. या गँगविरोधात यापूर्वीही मोक्कान्वये कारवाई करण्यात आली आहे. गँगचा म्हाेरक्या समीर ऊर्फ छोटा पठाण कारागृहात आहे. पोलिस आयुक्तांच्या कारकीर्दीतील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात असून, अशा अाणखी दाेन टाेळ्या पाेलिसांच्या रडारवर अाहेत.

शहर पोलिसांना खुले आव्हान देणाऱ्या टिप्पर गँगच्या नऊ कुख्यात गुन्हेगारांविरोधात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी अधिनियम कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याच्या हालचाली सुरू होत्या. संशयित गँगकडून सर्वसामान्य नागरिकांना धोका असल्याने पोलिस आयुक्त एस. जगन्नाथन यांनी पोलिस अधिकाऱ्यांसाठी ‘मोक्का’ कारवाईबाबत दोनदिवसीय कार्यशाळेचे अायोजन केले होते. त्यात सर्व बारकावे पोलिस अधिकाऱ्यांनी आत्मसात केल्यानंतर पुराव्यांसह ही कारवाई करण्यात आली.

३१ मे राेजी दुपारी तीन वाजता सिडकाेतील शुभम पार्क परिसरात टिप्पर गँगचा सूत्रधार कुख्यात गण्या कावळ्या ऊर्फ
काम सुरू ठेवले हाेते. दरम्यान, शहर जिल्ह्यातील वाद थांबत नसल्याचे पाहून प्रदेशाध्यक्षांनी जिल्हा प्रभारी म्हणून जितेंद्र अाव्हाड यांच्याकडे जबाबदारी साेपवली. अाव्हाड यांनी शहर जिल्ह्याची एकत्रित बैठक घेतली असता त्यात, शहराध्यक्ष हटाव माेहिमेचा नारा देत शक्तिप्रदर्शन करण्यात अाले. त्यानंतर काही दिवसांतच इच्छुक असलेल्या शेलार यांच्या गटाने अजित पवार यांची भेट घेऊन फेरबदलाची मागणी केल्याचे सांगितले जाते. दुसरीकडे, जाधव यांचे समर्थक नगरसेवक पदाधिकाऱ्यांनीही पवार, तटकरे अाव्हाड यांच्यासमाेर त्यांची बाजू मांडली. पक्षविराेधातील वातावरणनिर्मिती वाढत्या गटबाजीचा फटका बसेल अशी भीती व्यक्त केली. यावेळी सुळे याही उपस्थित हाेत्या. दाेन्ही गटांचे म्हणणे एेकून घेतल्यानंतर नाशिकचा निर्णय भुजबळ यांच्याकडेच साेपवल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे. पुढील अाठवड्यात सुळे भुजबळ यांना भेटणार असून त्यावेळी नाशिकसंदर्भात काय निर्णय घ्यायचा, हे भुजबळ यांना विचारले जाईल असे त्यांनी सांगितल्याचे समजते.
चुंभळे प्रकरणी१७ जूनला बैठक :
जि.प. अध्यक्ष चुंभळे यांच्याविराेधातील माेहीम थांबवण्याबराेबरच नाराज राष्ट्रवादी सदस्यांची बाजू एेकून घेण्यासाठी १७ जूनला जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी बैठक बाेलवल्याचे वृत्त अाहे. बुधवारी महिरावणी येथे अध्यक्षांविराेधात बैठक घेतल्यानंतर पवार, तटकरे यांच्याकडे जाण्याचा निर्णय सदस्यांनी घेतला हाेता. एक प्रकारे स्थानिक अध्यक्षांवर अविश्वासाचे हे चित्र हाेते. या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष प्रकाश वडजे, राष्ट्रवादी गटनेते रवींद्र देवरे, सदस्य नितीन पवार यांनी पगार यांना सदस्यांची बाजू सांगितली.
समर्थकांवरही होणार कारवाई
टिप्पर गँगचे समर्थक आणि प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मदत करणाऱ्या संशयितांविरोधातही मोक्कान्वये कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयात काही समर्थकांना अटक करण्यात आली होती. तर काही संशयितांचा तपास सुरू आहे.

टिप्पर गँगचे रेकॉर्ड ब्रेक गुन्हे
टिप्पर गँगच्या संशयितांवर शहरातील जवळपास सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत खून, दरोडा, शस्त्र बाळगणे, घरफोडी, सोनसाखळी चोरी, वाहन जाळपोळ, जीवे मारण्याचा प्रयत्न, दंगल, दहशत पसरवणे अादी गंभीर स्वरूपाचे सुमारे २८० च्यावर गुन्हे दाखल आहेत.

खंडणीबहाद्दरांना घेरणार
शहरातखंडणी,जमिनीवर बळजबरी कब्जा घेणे असे गुन्हे घडत आहेत. असा प्रयत्न काेणी करत असल्यास स्थानिक पोलिस ठाणे अथवा थेट पोलिस आयुक्तालयात कागदपत्रांसह तक्रार करावी. या गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येणार आहे. - एस. जगन्नाथन, पोलिसआयुक्त
बातम्या आणखी आहेत...