आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Me Against Rape Application Downloaded At Nashik

‘मी अगेन्स्ट रेप’ सॉफ्टवेअर ठरतेय तेरा हजार महिलांना साह्यभूत

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड- ‘दैनिक दिव्य मराठी’मुळे प्रकाशझोतात आलेले ‘मी अगेन्स्ट रेप’ सॉफ्टवेअरला मागणी वाढली आहे. हे सॉफ्टवेअर रोज 350 ते 400 महिलांकडून डाउनलोड केले जात आहे. मंगळवारपर्यंत तब्बल 13 हजार 500 महिलांनी या सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे.

दिल्ली येथे युवतीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर ‘दिव्य मराठी’ने नेबुला स्टुडिओ कंपनीचे इंजिनिअर गुणवंत बत्ताशे, अनुप उन्नीकृष्णन व जयेश बनकर यांनी तयार केलेले हे सॉफ्टवेअर समाजासमोर आणले. या सॉफ्टेवअरबाबतची माहिती महिला व तरुणींना व्हावी यासाठी पुढाकार घेऊन ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात प्रात्यक्षिक आयोजित करण्यात आले होते. त्याचा लाभ असंख्य महिलांनी घेतला होता. त्या कार्यक्रमाची चर्चा महाविद्यालयांमध्ये झाल्याने सॉफ्टवेअरला मागणी वाढली.

देशभरातून फोन
सॉफ्टवेअरच्या माहितीसाठी देशभरातून महिला तसेच नागरिकांचे फोन येत असून, सॉफ्टवेअरची अतिरिक्त माहिती विचारली जात आहे.
-गुणवंत बत्ताशे, इंजिनिअर

संकटकालीन सॉफ्टवेअर
वन टच हेल्पलाइन, दर दहा मिनिटाला करंट लोकेशन, हेल्प बटन दाबल्यावर मदतनीस, एसएमएससुध्दा जात असल्याने डाउनलोड करणार्‍यांमध्ये महिला व तरुणींची संख्या अधिक आहे.
-अनुप उन्नीकृष्णन व जयेश बनकर, इंजिनिअर