आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Me Against Rape Softwear Give Very Well Response

‘मी अगेन्स्ट रेप’ सॉफ्टवेअरला महिलांचा प्रतिसाद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- दैनिक दिव्य मराठीमुळे प्रकाशझोतात आलेल्या ‘मी अगेन्स्ट रेप’ या सॉफ्टवेअरला बाजारात मागणी वाढली आहे. रोज सुमारे 350 ते 400 महिलांकडून हे सॉफ्टवेअर डाऊनलोड केले जात असून मंगळवारपर्यंत तब्बल साडेतेरा हजार महिलांनी या सॉफ्टवेअरचा वापर सुरू केला आहे.

नेबुला स्टुडिओ कंपनीचे तरुण इंजिनिअर गुणवंत बत्ताशे, अनुप उन्नीकृष्णन व जयेश बनकर यांनी दिल्लीच्या घटनेनंतर महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी संशोधन करुन तयार केलेल्या ‘मी अगेन्स्ट रेप’ या सॉफ्टवेअरबाबत ‘दिव्य मराठी’ने बातमी प्रकाशित केली होती. या सॉफ्टेवअरचे फायदे, त्याचा वापर व डाऊनलोड कसे करायचे याची माहिती महिला व महाविद्यालयीन तरुणींना व्हावी यासाठी पुढाकार घेऊन नाशिकमध्ये त्याचे प्रात्यक्षिकही ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात आयोजित केले होते. या सॉफ्टवेअरबाबत जनजागृती झाल्यानंतर सध्या शहरात महिला व युवतींकडून त्याला मागणी वाढली आहे. मोफत डाऊनलोड करण्याची सुविधा असल्याने व सहज डाऊनलोड करता येत असल्याने दररोज किमान 400 महिला हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करत आहेत.

देशभरातून फोन
सॉफ्टवेअरच्या माहितीसाठी देशभरातून महिला तसेच नागरिकांचे फोन येत असून सॉफ्टवेअरची अतिरिक्त माहिती विचारली जात आहे. - गुणवंत बत्ताशे, इंजिनिअर

संकटकाळी मदत
संकटाच्या प्रसंगाच्या टिप्स, घटनेची वन टच रेकॉर्डिंग, प्रत्येक दहा मिनिटाला लोकेशन, तसेच हेल्प बटन दाबल्यावर मदतनीस, संकटकाळी कॉल, एसएमएस जात असल्याने या सॉफ्टवेअरला पसंती मिळत आहे.
अनुप उन्नीकृष्णन व जयेश बनकर, इंजिनिअर