आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अतिरिक्त कामाने अधिकारी, कर्मचारी मेटाकुटीस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- वैद्यकीय अधिकारी कर्मचा-यांवर रुग्णसेवेचा अतिरिक्त कामांचा वाढता ताण असल्याने त्यांच्यावरच उपचारांची गरज निर्माण झाली आहे. यासंदर्भात डॉक्टर कर्मचारी, परिचारिका संघटनांनी आरोग्य उपसंचालकांकडे तक्रार केली आहे. कामाचा ताण सहन झाल्याने निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य रुग्ण विभाग) डॉ. एस. एस. पाटील यांना हृदयविकाराचा झटका आल्याची तक्रारही करण्यात आली आहे.

जिल्हा रुग्णालयाचा कायापालट करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एकनाथ माले विविध उपाययोजना राबवीत आहेत. रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, याकरिता ते प्रयत्नांची पराकाष्ठाही करतात. मात्र, या सर्व खटाटोपात वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दैनंिदन कामाव्यतिरिक्त इतर कामेही करावी लागत असल्याने हे अधिकारी-कर्मचारी मेटाकुटीस आले आहेत. या प्रकारामुळे आरोग्यसेवेवर विपरीत परिणाम होत आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या एककलमी कामाकाजामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचा-यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. महिन्यापूर्वी महिला कर्मचाऱ्यास बाळंतपणाची रजा नाकारल्याने जिल्हा शल्यचिकित्सकांना आरोग्य विभागाने ‘मेमो’ काढल्याचे समजते. दरम्यान, काही संघटना मानवाधिकार विभागाकडेही तक्रारी करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वैद्यकीयअधिकारी आजारी :डॉ. एस. एस. पाटील यांना अतिरिक्त कामामुळे हृदयविकाराचा झटका आला असून, ते सध्या आजारपणाच्या रजेवर आहेत, तर काही वैद्यकीय अधिकारी निवृत्ती घेण्याच्या विचारात आहेत, असे तक्रारीत म्हटले आहे.