आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारीत सहभागी हाेणाऱ्या विठ्ठलभक्तांना वैद्यकीय सेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अकाेला - पंढरपूरच्या पायदळ वारीत सहभागी हाेणाऱ्या विठ्ठलभक्तांना वैद्यकीय सेवा मिळावी, यासाठी डाॅक्टरांचे पथक सज्ज झाले अाहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराज सेवा समितीतर्फे वैद्यकीय सेवा पथक उपलब्ध करून देण्यात येणार असून, या कार्याला २९ जूनपासून प्रारंभ हाेणार अाहे.
अाषाढी एकादशीनिमित्त हजाराे वारकरी पंढरपूर येथे जाण्यासाठी पायदळ वारीत सहभागी हाेतात. संत गजानन महाराज, संत तुकाराम महाराज पालखी साेहळ्यात सहभागी हाेणाऱ्या वारकऱ्यांची संख्या कमी नसते. संत ज्ञानेश्वर महाराज सेवा समितीतर्फे गत २५ वर्षांपासून वारकऱ्यांच्या सेवेत वैद्यकीय चमू सक्रिय अाहे. हे कार्य संस्थेचे सचिव स्व. भालचंद्र पागृत, गुरुवर्य वासुदेवजी महाराज, वै. राधे-राधे महाराज, वै. दयानंदजी, वै. पुष्पाबेन पंड्या, वै. पवनबाबू अग्रवाल, वै. शेषरावजी गावंडे (केळीवेळी) यांच्या अाशीर्वादाने सुरू असून, या सेवेचे यंदा हे २६वे वर्ष अाहे. वैद्यकीय सेवा पथक २९ जून राेजी एलअारटी महाविद्यालयाजवळ राहणाऱ्या गिरीश पंड्या यांच्या निवासस्थानावरून रवाना हाेणार अाहे. या वेळी अाचार्य शिवदत्तजी महाराज, कालिचरणजी महाराज, हभप माेहनजी महाराज गाेकथाकार हभप सुजीत महाराज देशमुख पथकाला हिरवी झेंडी दाखवून रवाना करणार अाहेत. सेवा पथकाला मदत करण्याचे अावाहन समितीतर्फे प्रकाश वाघमारे यांनी केले अाहे.

यासेवांचा समावेश : वैद्यकीयसेवा पथक नेत्र, चिकित्सा, मलमपट्टी, रक्त तपासणी, रक्तदाबाची तपासणी उपचार करण्यात येणार अाहेत. तसेच शिऱ्याचे वितरण करण्यात येणार अाहे. सेवा समितीतर्फे वारकऱ्यांच्या सेवेसाठी मलमपट्टी विभागात गजानन कथलकार प्रमिला डाेईफाेडे, चरण सेवा विभागात गाेपाल घाटे, गणेश शिंदे, विनाेद वाघमारे, मंटू वाघमारे, दत्ता शिंदे, बाळकृष्ण वाघमारे, फराळ विभागात विठ्ठल वाघ, निरंजन बाेर्डे, सदाशिव खाेटरे, संजय वाघमारे, डाॅ. किशाेर खडसे, अरुण उन्हाळे, चष्मा विभागात डाॅ. शुद्धाेधन वानखडे, डाॅ. चरणसिंह ठाकूर, राजेश वाघमारे, भाेजन विभागात हरिभाऊ तवाळे, देवकाबाई गिऱ्हे, उर्वरितपान
शारदावाघमारे, सुनंदा वाघमारे, वत्सला राखाेंडे हे कार्यरत राहणार अाहेत.

यांचीही मदत : वारकऱ्यांच्यासेवेच्या कार्यात कानशिवणी येथील श्री गाेपालकृष्ण गाेसेवा अनुसंधान केंद्र ही संस्थाही सहकार्य करणार अाहे, असे प्रकाश वाघमारे, गिरीश पंड्या, बाबुराव पवित्रकार, उमेश काेठारी, विनायक शेळके, देवकिसन भट्टड, जितेंद्र माेटवाणी, प्रभुदयाल भाला, संजय हेडा, प्रकाश भैया, राजेंद्र माेहाेकार, अॅड. रमेश जाेगी, तुलसीराम गाेयनका, राजेश मानधणे, उमेश टावरी, हरीश राठी, रमेश लढ्ढा, अनिल साेनी, माधव कुलकर्णी, संजय अग्रवाल, सुरेश कासट, गाेपाल शर्मा, मनीष अग्रवाल, गाेपाल अग्रवाल, कैलास अग्रवाल, प्रवीण अग्रवाल, राजेंद्र जाेगळेकर, अशाेक हेडा, अॅड. शंकरराव इंगाेले, संजय सिसाेदिया, गाेपाल गांधी, किरण खत्री, भागवत खुपे भारत भाेर यांनी कळवले अाहे.

११ तज्ज्ञांचा समावेश
पथकात डाॅ. राजकुमार बुले, डाॅ. विजय घंगाळे, डाॅ. शिवचरणसिंह ठाकूर, डाॅ. गीता घंगाळे, डाॅ. मुरलीधर जळमकार, डाॅ. जनार्दन वानखडे, डाॅ. रमेश बरडे, डाॅ. सचिन पासरकर, डाॅ. शुद्धाेधन वानखडे, डाॅ. दिनेश काकड यांचा समावेश राहणार अाहे.

वाहनांचाही समावेश
पथकामध्ये ट्रक मिनी ट्रकचा समावेश राहणार अाहे. वाहन व्यवस्थेची जबाबदारी गजानन हेमणे, अंबादासजी राऊत, साहेबरावजी शेळके, विठ्ठलदासजी हेडा यांच्याकडे साेपवण्यात अाली अाहे. वाटेवरील नियाेजन संजय वाघमारे, मारुती वाघमारे, अमाेल वाघमारे दादा साबळे करणार अाहेत.
बातम्या आणखी आहेत...