आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषधे विक्रेत्यांचे आजपासून उपोषण

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - शहरातील औषधे विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासनाच्या निरीक्षकांकडून तपासणीच्या नावे जाचक कारवाई केली जात आहे. याविरोधात औषध विक्रेते गुरुवारपासून (दि. 14) साखळी उपोषण करणार आहेत. जनतेची सेवा करणार्‍यांना गुन्हेगाराप्रमाणे वागणूक दिली जात असल्याचा आरोपही नाशिक केमिस्ट असोसिएशनने केला आहे.

पूर्णवेळ औषध विक्रेता नसल्याचे कारण पुढे करीत थेट विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले जात आहेत. फार्मासिस्टच्या देखरेखीखाली औषध विक्री झाली पाहिजे, या कायद्यातील तरतुदीस असोसिएशनचा विरोध नाही. परंतु, औषधे निर्माता काही वेळासाठी बाहेर गेला अन् विक्री झालीच नाही तर कायदा कुठे हाती घेतला, असा सवाल उपस्थित करण्यात आला. विक्रेत्यांना न्याय मिळण्यासाठी एफडीएच्या कार्यालयासमोर सुरेश पाटील, अतुल आहिरे, योगेश कदम, महेश भावसार, संदीप शेवाळे, किशोर बगदे, नितीन औटी, हिरालाल पाटील, प्रशांत पवार, संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली साखळी उपोषण करण्यात येणार असल्याचेही पत्रकात म्हटले आहे.