आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Medical Student News In Marathi, Nashik, Education

मेडिकलच्या अकराशे विद्यार्थ्यांचा प्रश्न पुन्हा अधांतरीच

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सर्वोच्च न्यायालयाने वैद्यकीय शाखेच्या अकराशे विद्यार्थ्यांना अवैध ठरवल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठ आणि वैद्यकीय शिक्षण विभागाने तयार केलेला नवा अभ्यासक्रम शासनाच्या विधी आणि न्याय विभागाने नाकारला आहे.

दोन वर्षांपूर्वी मेडिकल कौन्सिलने काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये त्रुटी आढळल्याने आरोग्य विद्यापीठाशी संलग्नता रद्द केली होती. सर्वोच्च न्यायालयानेही महाविद्यालयांच्या विरोधात निकाल दिल्याने विद्यार्थ्यांचे दोन-तीन वर्षे वाया जाणार आहेत, हे स्पष्ट झाले. मात्र, या डॉक्टरांना राज्यात प्रॅक्टिस करता यावी, असा मुद्दा समोर आला. त्यासाठी नुकतेच नागपूर येथे विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात त्यांच्यासाठी वर्षभराचा अभ्यासक्रम सुरू करावा, असा प्रस्ताव शासनासमोर मांडण्यात आला. त्यावर शासनाने सकारात्मकता दर्शवित कायद्याने परवानगी घेण्यासाठी तो विधी आणि न्याय विभागाकडे दिला; परंतु या विभागाने त्यास नकार दिल्याने हा प्रस्ताव बारगळण्याची शक्यता आहे.

मान्यतेसाठी प्रयत्न करू
विधी आणि न्याय विभागाकडे देण्यात आलेला प्रस्ताव या विभागाने नाकारला आहे; परंतु या विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आता मी स्वत:च मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पुन्हा भेटणार आहे. कायद्याच्या चौकटीत तो कसा बसविता येईल, यावर चर्चा करून तो लागू कसा करता येईल, यासाठी प्रयत्न करणार आहे.
-डॉ. विजयकुमार गावित, वैद्यकीय शिक्षणमंत्री