आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंगणी फुलवला औषधी बगिचा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक शहरातील एका जोडप्याने जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, पेठ, हर्सूल, सुरगाणा या भागातील जंगलात भटकून 18 प्रकारच्या औषधी वनस्पती गोळा केल्या. या दुर्लभ औषधी वनस्पती आज त्यांच्या अंगणात डोलत आहेत. राजेंद्र तोडकर ग्लॅक्सो फार्मा कंपनीत केमिस्ट आहेत, तर त्यांच्या पत्नी संध्या हिंदीच्या प्राध्यापक. संध्या यांचे आजोबा प्रसिद्ध वैद्य होते, त्यांच्याकडूनच संध्या यांना औषधी वनस्पतींबाबत माहिती मिळाली.

तीन हजार चौरसफूट जागेवर उभ्या त्यांच्या बंगल्याच्या आजूबाजूला त्यांनी ही बाग फुलवली आहे. पोटात दुखत असेल तर त्यासाठी मुरड शेंग, बाळाचे दात येताना त्रास होत असेल तर डिकेमाली. कोणी जर तापाने फणफणत असेल तर गुळवेलीचे सत्त्व. त्यांच्या या बागेत पिवळ्या हळदीसह निळी, नारंगी आणि हिरवी हळदही आहे. राजेंद्र तोडकर सांगतात की, मधुमेहावर उपचारासाठी त्यांच्याकडे तीन वनस्पती आहेत. गुडमार, इन्सुलिन आणि स्टीव्हिया. गुडमारची पाने खाल्ली तर पुढचे तीन तास साखर गोड लागत नाही. तर स्टीव्हियाची पाने साखरेपेक्षा तिप्पट गोड असतात. सध्या बाजारात मधुमेहावर मिळणारी सगळी औषधे याच वनस्पतींपासून बनलेली असतात.