आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोग्य विद्यापीठात काम ठप्प

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या साडेचारशे कर्मचार्‍यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी काम बंद आंदोलन केले. कुलगुरुंशी झालेल्या बैठकीत कुठलाही तोडगा न निघाल्याने शुक्रवारी पुन्हा बैठक होणार आहे.

शासन निधीतील कर्मचार्‍यांचे अनुदान शासनाने मंजूर करूनही गेल्या चार महिन्यांपासून वेतन वेळेवर होत नसल्याने यापुढे कर्मचार्‍यांचे वेतन कोषागारातूनच व्हावे, तसेच आयुर्वेद वेतन प्रणालीऐवजी विद्यापीठीय वेतन प्रणाली अवलंबावी, राज्यपालांच्या आदेशान्वये विद्यापीठास महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करावेत, विद्यापीठातील तीन दिवंगत कर्मचार्‍यांच्या कुटुंबीयांना तातडीने आर्थिक लाभ मिळावा, तसेच कंत्राटी कर्मचार्‍यांना फिक्स पे दिले जावे, अशा विविध मागण्या कर्मचार्‍यांनी केल्या आहेत. या मागण्यांचे निवेदन त्यांनी कुलगुरुंना दिले. आंदोलनकत्यार्ंनी प्रारंभी विद्यापीठाच्या गेटवरच आंदोलन केले होते. प्रशासनाने त्वरित पोलिसांना पाचारण केल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही.