आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कचर्‍यात आढळली दवाखान्यातील औषधे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडको- त्रिमूर्ती चौकातील दिव्या अँडलॅब येथे रस्त्याच्या कडेला कचर्‍यामध्येच दवाखान्यातील औषधे टाकली जात असल्याचा प्रकार आढळून आला आहे.

याबाबत रहिवाशांनी तक्रार केली असून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दवाखान्यातील जैविक कचरा हानीकारक असतो. त्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रशासनाने विशिष्ट नियमावली केलेली आहे. मात्र, काही बेजबाबदार डॉक्टरांमुळे किंवा त्यांच्या कर्मचार्‍यांमुळे दिव्या अँडलॅब येथील आयसीआयसीआय बँकेच्या एटीएमसमोर चार-पाच दिवसांपूर्वी हा कचरा थेट रस्त्याच्या कडेला टाकण्यात आलेला आहे.