आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

स्वस्त औषधांचे वास्तव कडवटच; सरकार-औषध कंपन्यांत विसंवाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- 'डीपीसीओ’अंतर्गत 1 ऑगस्टपासून स्वस्त औषधे उपलब्ध असल्याचा दावा केमिस्ट-ड्रगिस्ट असोसिएशनकडून केला जात असला तरी ही औषधे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याचे वास्तव आहे. सरकार व औषध कंपन्यांतील विसंवादामुळे अद्यापही अनेक औषधे उपलब्ध झालेली नसून रुग्णांमध्ये याबाबत गोंधळ आहे.

ड्रग्ज प्राइज कंट्रोल ऑर्डर अंतर्गत केंद्र शासनाने 17 जूनला जाहीर केलेल्या 154 औषधी घटकद्रव्यांवर अवलंबित औषधे 46 दिवसांनंतर म्हणजे 1 ऑगस्टपासून बाजारात उपलब्ध होणे आवश्यक होते. मात्र, ‘डीपीसीओ’च्या आदेशाबाबत औषध कंपन्या आणि विक्रेत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाल्याने 6 ऑगस्टच्या सायंकाळपर्यंत काही कंपन्यांचीच औषधे बाजारात आली होती. त्यातही उत्पादनाच्या दृष्टीने छोट्या व मध्यम कंपन्यांची औषधे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. रक्तदाब, अँँजिथ्रोमायसीन आणि हृदयरुग्णांचे स्ट्रेप्टोकायसन इंजेक्शन नव्या दरांत उपलब्ध आहेत. र्जमन रेमेडीज, डॉ. रेड्डीज आदी कंपन्यांची औषधेही आल्याने 50 टक्के स्वस्त औषधे उपलब्ध आहेत.

जुन्या औषधांची विक्री आणि कंपन्यांना नवी औषधे उपलब्ध करून देण्यासाठी 46 दिवसांची मुदत देण्यात आली. ही मुदतीच्या प्रारंभाबाबत शासन व औषध कंपन्यांतील असामंजस्यामुळे ही स्थिती उद्भवली आहे. यापूर्वी 180 दिवसांची मुदत दिली जायची. ती 46 दिवसांवर आणल्याने नव्या दरातील औषधांसाठी पुरेसा वेळच कंपन्यांना मिळाला नाही. 31 जुलैला औषध विक्रेत्यांनी जुन्या दराची औषधे कंपन्यांना परत केल्याने रुग्णांची मात्र मोठीच अडचण झाली आहे.

डॉक्टरांनी द्यावा जेनरिकचा पर्याय
रुग्णांना स्वस्त दरातील औषधे मिळण्यासाठी डॉक्टरांनी स्वस्त जेनरिक औषधांचा पर्याय द्यावा. सर्व औषधे उपलब्ध व्हायला आठ दिवस लागतील. -गोरख चौधरी, जिल्हाध्यक्ष, केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असो.