आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ताप’ जैविक कचऱ्याचा, कचऱ्याच्या विल्हेवाटीसाठी असलेली यंत्रणाच कुचकामी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- औषधौपचारानंतर उरलेला वैद्यकीय कचरा मानवी जीवनाला धोकादायक आहे. शहरातील काही भागांतील हा कचरा उचलला जात असला तरी अनेक रुग्णालयांतील हा धोकेदायक कचरा अासपासच्या ‘ब्लॅक स्पाॅट’वरच फेकला जात असल्याची धक्कादायक बाब डी. बी. स्टारच्या पाहणीत समोर आली आहे.
 
विशेष म्हणजे, खासगी रुग्णालयांकडून यासंदर्भात याेग्य ती काळजी तर घेतली जात नाहीच, पण संदर्भ सेवा रुग्णालयातील जिल्हा हिवताप कक्षातदेखील हीच परिस्थिती अाहे. किंबहुना यापेक्षा अधिक निष्काळजीपणा येथे दिसताे. येथे तर रक्ताचे नमुने घेतलेल्या काचांसह इतर वैद्यकीय कचरा रुग्णालयाच्या टेरेसवरच साठवून ठेवल्याचे डी. बी. स्टारच्या कॅमेऱ्यास सापडले अाहे. या सर्व बाबींचा घेतलेला हा अाढावा...
 
जैविक कचऱ्यातून आजाराचा संसर्ग पसरण्याचा तसेच त्यातूनच सर्वात माेठा धाेका म्हणजे त्यातील वस्तू पुन्हा वापरल्या जाऊ शकतात हा अाहे. म्हणून शासकीय व खासगी रुग्णालयांमधून निघणाऱ्या जैविक कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आलेली आहे. मात्र, ही यंत्रणाही कुचकामी असल्याचे चित्र आहे. ख‌ासगी तर नाहीच, पण शासकीय  रुग्णालयातील जैविक कचऱ्याचीही विल्हेवाट व्यवस्थित हाेत नाही.
 
विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयाच्या हिवताप कक्षाच्या  टेरेसवरच कचरा साठवून ठेवण्यात अालेला अाहे.  त्याचबरोबर शहरातील काही रुग्णालयांकडून रस्त्यांवर, नेहमीच्या ब्लॅक स्पाॅटवर विल्हेवाट लावली जाते. अशा  कचऱ्यामुळे कावीळ, क्षयरोगासारखे आजार होऊ शकतात. मात्र, यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही जनजागृती हाेत नाही. उलट शासनाच्याच रुग्णालयांतच यासंदर्भात दुर्लक्ष हाेत असल्याचे दिसून येत अाहे.

अशी हाेऊ शकते कारवाई
संदर्भ सेवा रुग्णालयाच्या हिवताप कक्षाच्या टेरेसवर रक्त नमुना तपासणीच्या काचा पडलेल्या अाहेत. विशेष म्हणजे, या काचा गेल्या अनेक महिन्यांपासूनच याच ठिकाणी पडलेल्या अाहेत. यातून पसरणारे संसर्गजन्य रोग, कीटक आदींची वाढ त्यामुळे येथे अाराेग्य समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते. मात्र, याकडे रुग्णालय प्रशासनासह सर्वांचेच दुर्लक्ष अाहे.

कामगारांनाही धोका
रुग्णालयातील रक्ताने माखलेले कापसाचे बोळे, शरीराचे अवयव, सिरींज, कॅप्सूल, बॅण्डेज, चिकटपट्ट्या, नष्ट करण्यासारखे काही वैद्यकीय घटक, रक्ताच्या पिशव्यांसारखा कचरा हा जैववैद्यकीय कचरा असताे. त्याची योग्य विल्हेवाट न लावल्यास अन्य गंभीर समस्या उद‌्भवू शकतात. दुर्गंधी, संसर्गजन्य रोग, कीटक आदींची वाढही हाेऊ शकते. काही घरांमधूनही असा कचरा निर्माण हाेताे. त्यामुळे अशा कचऱ्याची विल्हेवाट लावणारे कामगारही दुर्धर रोगांना अधिक बळी पडू शकतात.
 
पुढील स्‍लाइडवर वाचा,
- रस्त्यावरही फेकला जाताे जैववैद्यकीय कचरा
- ‘संदर्भ’च्या हिवताप कक्षाच्या टेरेसवरील काचांचा ढीग
- थेट सवाल (डॉ. विजय डेकाटे, आरोग्याधिकारी, महापालिका)
बातम्या आणखी आहेत...