आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढीत फसले विभागीय क्रीडा संकुल

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ठेकेदाराची चालढकल आणि मुदतवाढीच्या जंजाळात मीनाताई ठाकरे इनडोअर स्टेडियमचे काम अडकले आहे. तब्बल अडीच वर्षे उलटली तरी, आतापर्यंत केवळ 65 टक्के काम झाले आहे. ते लवकरच पूर्णत्वास येईल, असा दावा प्रशासनाकडून करण्यात येत असला तरी, त्यात तथ्य दिसत नाही.
नाशिकच्या खेळाडूंना चांगल्या दर्जाचे स्टेडियम मिळावे, यासाठी महापालिकेने कचरा डेपोच्या जागी एक इनडोअर स्टेडियम उभारले, पण तेही नावापुरतेच! त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाच्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. तसेच येथे कोणत्याही क्रीडा स्पर्धा झाल्या नाहीत. जिल्हा क्रीडा विभागाने 2007 साली महापालिकेकडून 30 वर्षांच्या करारावर घेतले आहे. स्टेडियमच्या उभारणीसाठी सुरू असलेल्या कामाला दोन वेळा मुदत वाढ देण्यात आली. तरीही स्थितीत फारसा फरक पडला नाही.
शासनाने हे स्टेडियम तसेच त्यालगत क्रीडांगण उभारण्यासाठी 23 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. साडेतेवीस एकर जागेवर 23 कोटी रुपये खर्च करून अत्याधुनिक स्टेडियम उभारले जात आहे. क्रीडा विभागाकडे हस्तांतरीत होण्यापूर्वी महापालिकेने या स्टेडियमचे बांधकाम पूर्ण केले होते. परंतु मध्यंतरी वाहणा-या जोरदार वा-याने स्टेडियमचे पत्रे उडून गेले होते. स्टेडियमच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्या आहे.
पाणी जाते वाया
त्याच्या आवारात पाण्याची पाइपलाइन गेल्या पाच वर्षापासून फुटलेली असून, तिच्यातून आतापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले आहे आणि अजूनही जात आहे. परंतु याची महापालिका व क्रीडा विभागाने कोणतीही दखल घेतलेली नाही, हे विशेष! या पाण्याचा स्थानिक महिला कपडे धुण्यासाठी वापर करीत आहेत.
इमारतीचा मुख्य दरवाजा तुटलेला असून, स्टेडियममध्येही वूडन फ्लोरिंग करणे बाकी आहे. क्रीडा विभागाने स्टेडियम ताब्यात घेतल्यापासून सुधारणा सुरू केली आहे. तसेच स्टेडियमलगत हॉकी, फुटबॉल, बास्केटबॉल यासारख्या मैदानी खेळांसाठी स्टेडियम तयार करण्यात येत आहे.
करार झाल्यानंतर क्रीडा विभागाकडून महापालिका स्टेडियमच्या बांधकामाचे पैसे घेणार आहे. क्रीडा विभागाला करारपद्धतीने द्यायचेच होते तर केवळ इमारत पूर्ण करण्यासाठी घाई कशासाठी केली.
ठेकेदारावर दंडात्मक कारवाई - 2009 साली भूमिपूजन झाल्यानंतर दोन वर्षात काम पूर्ण होईल, असे अपेक्षित होते. परंतु याची मुदत गत जुलैला संपली. पण काम अपुरेच राहिल्याने डिसेंबरपर्यंत मुदत वाढवून देण्यात आली. तरीही काम पूर्ण झाले नाही. त्यातच नेमण्यात आलेला आर्किटेक्ट पळून गेला. म्हणून क्रीडा विभागाने स्टेडियम उभारणीचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याकडे दिले आहे. परंतु संबंधित ठेकेदाराला क्रीडा विभागाने काम वेळेवर पूर्ण झाले नसल्याने 500 रुपये प्रति दिवस अशा स्वरुपाची दंडात्मक कारवाई केली आहे.