आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला अाखाड्याच्या जागेसाठी अाता पंतप्रधान माेदींना भेटणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘वारंवार मागणी करूनही साध्वींच्या आखाड्यांसाठी जागा देण्यास अश्वासनांपलीकडे काहीच मिळत नाही. जिल्हाधिकारी, पालकमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडेही मागणी केली आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असून त्यात जागा न मिळाल्यास आता थेट पंतप्रधानांनाच भेटून आमची व्यथा मांडणार अाहाेत,’ असा इशारा साध्वी त्रिकाल भवंताजी यांनी दिला.
‘सिद्धी प्राप्त झाल्यानंतर किंवा महंताई प्राप्त झाल्यानंतर साधू-महंतांमध्ये स्त्री-पुरुष असा कुठलाही भेदच राहत नाही. असे असतानाही काही साधूंकडून साध्वींच्या आखाड्यासाठी देण्यात येणाऱ्या जागेसाठी विरोध केला जात आहे. ही खेदाची बाब असून, प्रशासनाही त्यांच्याच बाजूने विचार करत आहे. ही प्रशासन आणि पुरुष साधू-महंतांची मिलीजुली अाहे,’ असा आरोप साध्वी भवंताजी यांनी केला. शिवाय आमच्या आखाड्यांची परी नावाने नोंदणी असून, जागा मिळायलाच हवी. पण प्रशासन टाळाटाळ करतेय. म्हणून आता मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहोत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत जागा मिळेल अशी अपेक्षा आहे.’
महिलांचा अपमान सहन करणार नाही
ध्वजारोहण सोहळ्यात व्यासपीठावर ज्या-साधूंनी सर्वांसमोर माझे हात पकडले. मला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. हे कायद्याने चुकीचे होते. त्यावर पोलिसांनी कारवाई करणे अपेक्षित होते. परंतु तसे झाले नाही. हा महिला साध्वींचा अपमान आहे, तो आम्ही सहन करणार नाही. संबधितांवर कारावाई झालीच पाहिजे, अशी मागणी साध्वी भवंताजी यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...