आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Meeting Public Library Held Under Police Bandobast

‘सार्वजनिक वाचनालय’ची आजची सभा पोलिस बंदोबस्तात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सार्वजनिक वाचनालय, नाशिकची (सावाना) बुधवारी (दि. ३०) होणारी वार्षिक सर्वसाधारण सभा पोलिस बंदोबस्तात होण्याची चिन्हे आहेत. शतकोत्तर अमृतमहोत्सव साजरा करणारी ‘सावाना’ या संस्थेच्या इतिहासात प्रथमच संस्थेला सभेसाठी पोलिस बंदोबस्ताची मागणी करावी लागली आहे. एका आक्रमक संघटनेचे कार्यकर्ते या सभेत गोंधळ घालण्याची शक्यता आहे, अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने नाव घेण्याच्या अटीवर सांगितली.
राज्याच्या मराठी साहित्य वर्तुळात सार्वजनिक वाचनालय, नाशिकचे नाव प्राधान्याने घेतले जाते. १७५ वर्षे होत असल्याने महोत्सव साजरा करत असताना यंदाच्या सभेत कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून भद्रकाली पोलिसांत ‘सावाना’च्या विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पोलिस संरक्षणाची मागणी केली आहे. २०१२मध्ये नवीन कार्यकारिणी निवडून आल्यानंतर मावळत्या कार्यकारिणीतील काही पदाधिकाऱ्यांनी विविध मार्गाने विद्यमान पदाधिकाऱ्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला आहे. या संदर्भात काही खटलेही सुरू आहेत. दरम्यान, सावानाचे तत्कालीन अध्यक्ष मधुकर झेंडे आणि मुख्य कार्यवाह श्रीकांत बेणी यांचे संस्थेने सदस्यत्वही रद्द केल्याने वाद अधिकच चिघळला आहे. तसेच, कारवाई झालेले माजी पदाधिकारी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर नेहमीच संस्थेत जातिभेद होत असल्याचा आरोप करतात. या मुद्यावरूनच हे पदाधिकारी सोमवारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ घालताना एका आक्रमक संघटनेच्या कार्यकर्त्यांना पुढे करतील, अशी कुणकूण सावानाच्या पदाधिकाऱ्यांना आदल्या संध्याकाळी लागली. त्यामुळे त्यांनी तत्काळ भद्रकाली पोलिसांत बंदोबस्ताची मागणी केली आहे. दरम्यान, माजी पदाधिकाऱ्यांचा एकेक भ्रष्टाचार आता बाहेर येत असल्याने ते काेणत्याही थराला जात असून, ते उद्या लाठ्याकाठ्याही घेऊन सभेत हैदोस घालतील, भीती नाही, पण सभा सुरळीत पार पडावी आणि संस्थेचे नाव खराब होऊ नये या दृष्टीने आम्ही पोलिस बंदोबस्ताची मागणी केल्याचे या पदाधिकाऱ्याने सांगितले. तसेच, सभेला सभासदांनी आवर्जून उपस्थित राहावे सत्य समजून घ्यावे, असे आवाहनही या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
बंदोबस्त देणार
सार्वजनिक वाचनालयाने बंदोबस्ताची मागणी केली आहे. त्याप्रमाणे एक अधिकारी आणि चार कर्मचारी असा बंदोबस्त सभेसाठी देण्यात आला आहे. अनुचित प्रकार टाळण्यासाठी प्रयत्न केले जातील. मधुकरकड, वरिष्ठ निरीक्षक, भद्रकाली पोलिस ठाणे
वार्षिक सभा आज
सार्वजनिकवाचनालयाची वार्षिक सभा बुधवारी (दि. ३०) दुपारी वाजता सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर यांच्या अध्यक्षतेखाली वाचनालयाच्या स्व. माधवराव लिमये सभागृहात होणार आहे. या सभेत नेहमीच्या विषयांबरोबरच सभासद वर्गणीची पुनर्रचना करणे हा महत्त्वाचा विषय असेल.