आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिंद्राप्रकरणी आज बैठक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सातपूर येथील महिंद्रा अँण्ड महिंद्रा कंपनीतील कामगार युनियन आणि व्यवस्थापन यांच्यातील वेतनवाढीचा तिढा सोडविण्यासाठी सोमवारी दुपारी 4 वाजता कामगार उपायुक्त कार्यालयात बैठक होणार आहे.

वेतनवाढीच्या प्रo्नावरून यापूर्वी कामगारांनी 5 आणि 6 मार्च रोजी टुल डाऊन आंदोलन केले होते. याचदरम्यान युनियनचे जनरल सेक्रेटरी प्रवीण शिंदे यांनी आमरण उपोषणही सुरू केले होते. कामगार उपायुक्त आर. एस. जाधव यांनी युनियन आणि व्यवस्थापन यांच्यात केलेल्या मध्यस्थीने 7 मार्च रोजी आंदोलन मिटले होते. यावेळी दोन्हीपक्षांनी केलेल्या करारानूसार 15 एप्रिलपर्यंत वेतनवाढ करारपुर्ण करायचा होता, तो झालेला नसल्याने ही बैठक होत आहे.

7 मार्चनंतर कंपनी व्यवस्थापन आणि युनियनन अशा अनेक फेर्‍या झडल्या मात्र करार होवू शकलेला नाही. कामगारांनी कंपनीच्या ऑटोमोटीव्ह विभागाचे अध्यक्ष डॉ.पवन गोएंका यांच्याशी देखील चर्चा केली मात्र तोडगा निघाला नाही. कामगार उपायुक्तांनी दिलेली डेडलाईन 15 एप्रिल पर्यंतची असल्याने पून्हा टुल डाऊनसारखे आंदोलन होवून उद्योग बाधीत होवू नये याकरीता तोडगा काढण्यासाठी ही बैठक महत्वाची मानली जात असून उद्योगजगताचे लक्ष बैठकीकडे लागून आहे.


तोडग्याची अपेक्षा
डॉ.गोएंका यांच्या सोबत झालेल्या बैठकीत दहा हजार रूपयांपेक्षा कमी वेतनवाढ घेणार नाही, असे मी सांगितले. याच बैठकीत जनरल सेक्रेटरी प्रविण शिंदे यांनीही टुल डाऊन, संप यांसारखे आंदोलन करणार नसल्याची भुमिका व्यवस्थापनापुढे मांडली आहे. याचाच अर्थ कामगार सकारात्मक असून या बैठकीतून तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. शिरीष भावसार, अध्यक्ष, महिंद्रा युनियन