आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mekluhana Speak In A Torch For Peace Programme At Nashik

‘अ टॉर्च’ तरुणांसाठी प्रेरणादायी, मॅक्लुहान यांचे प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- खान अब्दुल गफार खान ऊर्फ सरहद्द गांधी यांच्यावरील ‘अ टॉर्च फॉर पीस’ माहितीपट प्रत्येक तरुणाला प्रेरणा दायी ठरेल, अशी भावना निर्मात्या व दिग्दर्शिका टेली मॅक्लुहान यांनी व्यक्त केली. सिटी सेंटर मॉलमधील सिनेमॅक्समध्ये या माहितीपटाचे शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत सादरीकरण झाले. त्या वेळी त्या बोलत होत्या.

पालकमंत्री छगन भुजबळ यांनी, विद्यार्थी व अभ्यासकांसाठी ऐतिहासिक पुराव्यांसोबत सादर झालेला हा माहितीपट बौद्धिक पर्वणीपेक्षा कमी नाही, अशा शब्दांत मनोगत व्यक्त केले.

या वेळी खासदार समीर भुजबळ, शेफाली भुजबळ, नीलिमा पवार, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, ब्यूरो चीफ अभिजित कुलकर्णी, शर्वरी लथ आदींसह विद्यार्थी व अभ्यासक उपस्थित होते.

इतिहास उभा राहिला
खान अब्दुल गफार खान या एका प्रभावी व्यक्तिमत्त्वाचा जीवनप्रवास या माहितीपटाने डोळ्यासमोर उभा राहिला. त्यांना इतिहासातून काहीसे वगळल्यासारखे जाणवले. -सिद्धार्थ वर्मा, विद्यार्थी

प्रेरणादायी कथा
माहितीपटाची कथा प्रत्येक व्यक्तीकरिता प्रेरणादायी ठरणारी वाटली. अशा व्यक्तिमत्त्वाची माहिती होण्यासाठी माहितीपट प्रभावी साधन असल्याचा प्रत्यय आला. -कॅथरिन एप्पेन, विद्यार्थिनी

माहितीपट अभ्यासण्याची गरज
जी व्यक्ती आयुष्याच्या 98 वर्षांच्या कालावधीत 30 वर्षे फक्त मानवी हक्कांसाठी तुरुंगात काढते, अशा व्यक्तीची ही कथा आहे. स्वत: गांधीजींनी या माहितीपटात मान्य केले आहे, की खान यांचा लढा अवघड होता. त्यामुळे हा माहितीपट अभ्यासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर यांनी या वेळी केले.

‘अ टॉर्च फॉर पीस’ या माहितीपटाच्या सादरीकरणावेळी बोलताना पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत ‘दिव्य मराठी’चे मुख्य संपादक कुमार केतकर, खासदार समीर भुजबळ, माहितीपटाच्या निर्मात्या-दिग्दर्शिका टेली मॅक्लुहान.